भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय ‘त्याच’ जागेवर होणार

 

मुंबई | आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय स्थापन करण्याचे लता मंगेशकर यांचे स्वप्न होते. आता ते स्वप्न सत्यात उतरणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. तसेच ऑफलाईन परीक्षांसंदर्भातही सामंत यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. भारतरत्न स्वर्गीय लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयासाठी विद्यापीठाकडे जागा मागितली होती. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे ही जागा मिळू शकली नाही.

तसेच कलिना संकुलाच्या अगदी समोर उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे तीन एकरची जागा आधी इंडियाबुल्स कडे होती. ती जागा आता पुन्हा विभागाच्या ताब्यात आहे. त्या जागेवर भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय निर्माण करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे असे सामंत म्हणाले.

आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय स्थापन करण्याचे लता मंगेशकर यांचे स्वप्न होते. कलिना कॅम्पससमोर असे विद्यालय स्थापन करण्यासाठी एका समितीची स्थापनाही करण्यात आली होती. आता याच समितीने आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे नाव भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर असे असावे असा प्रस्ताव दिला. लतादीदींच्या निधनानंतर आता हे आंतरराष्ट्रीय महाविद्यालय स्थापन करण्यात येत असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी माहिती देताना म्हणाले.

Team Global News Marathi: