दीपाली चव्हाण हिने बदलीसाठी आघाडीच्या कोणत्या नेत्याला पैसे दिले होते ? भाजपचा सवाल

वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केल्यानंतर लिहिलेल्या चिट्टीमधून अनेकांची नावे समोर आली असतानाच त्यांच्या बदली संदर्भात खळबळजनक माहिती आता पुढे आली आहे. मेळघाट या दूर्गम भागातील वनक्षेत्रात सेवेत असणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना साधारणत: ३ वर्षांनी बदली दिली जाते.

मात्र हे संकेत दीपाली यांच्याबाबतीत उलट त्यांनी बदलीसाठी अर्ज केल्यानंतर बदलीसाठी वेगळ्या मार्गाने त्यांच्याकडून पैसे उकळण्यात आले, असा दावा भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे बदली संदर्भात त्या चिंतेत होत्या हा पॉईंट पुढे आला आहे.

चव्हाण यांची मेळघाटात २०१४ पासून २०२१ पर्यंत सेवा झाली होती. त्यामुळे मेळघाटाबाहेर त्यांना बदली हवी होती. हरिसाल येथून परतवाडा किंवा अमरावती येथे बदली मिळावी यासाठी दीपाली चव्हाण यांचा प्रयत्न सुरू होता. त्यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. मात्र, त्याची दखल घेतली जात नसल्याने त्या निराश झाल्या होत्या.

तसेच बदलीसाठी त्यांच्याकडून पैशांची मागणी करण्यात आली होती. त्यात आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्याने त्यांच्याकडून पैसे घेतले. हे पैसे घेऊनही त्यांची बदली केली गेली नाही. त्यामुळे त्या खचून गेल्या होत्या. त्यांना नैराश्य आले होते. म्हणूनच त्यांनी कोणत्या नेत्याला पैसे दिले होते?, याचा तपास केला गेला पाहिजे अशी मागणी भाजपने केली आहे.

Team Global News Marathi: