पोलीस अधिकारी, मंत्री आणि राजकारणी सर्व कायद्यापेक्षा श्रेष्ठ आहेत का? न्यायालयाने सुनावले खडेबोल

मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे मार्फत १०० कोटी रुपयांच्या हप्ता वसुलीचा आरोप लावून एकच खळबळ उडवून दिली होती, या आरोपानंतर आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात सिंह यांनी हायकोर्टाचे दार ठोकावले होते.

त्यात आता परमबीर सिंग यांच्यावतीने गृहमंत्री देशमुख यांच्याविरोधातील याचिकेवर आज मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यातच आता हायकोर्टाने परमबीर सिंह यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहे. तुम्ही पोलीस अधिकारी आहात, जेव्हा आपल्याला या गुन्ह्याबद्दल कळल तर एफआयआर नोंदवणे आपले कर्तव्य होते.

मात्र आपण तसे केले नाही. तुम्ही तसे का केला नाही. एखाद्या सामान्य माणसालाही एखाद्या गुन्ह्याबद्दल माहिती मिळाल्यास FIR दाखल करणे अपेक्षित असते. परंतु पोलिस अधिकारी म्हणून गुन्हा घडतोय हे माहिती असूनही FIR दाखल केलेला नाही, हे तुमचं अपयश आहे, असं मुख्य न्यायमूर्तींनी परमबीर सिगांना सुनावले.

तुम्ही पोलीस आयुक्त आहात, तुमच्यासाठी कायदा बाजूला ठेवला पाहिजे का? पोलीस अधिकारी, मंत्री आणि राजकारणी सर्व कायद्यापेक्षा श्रेष्ठ का? स्वत: ला कायद्यापेक्षा मोठं समजू नका, कायदा तुमच्यावर आहे, असे खडबोल न्यायमूर्तींनी सुनावले. सध्या राज्याचे पोलीस तपास करतील, असं न्यायमूर्ती म्हणाले.

Team Global News Marathi: