ते तोडण्याचा प्रयत्न करतील, आम्ही जोडण्याचा प्रयत्न करू

 

राज्यात घडलेल्या धक्कादायक राजकीय घडामोडींसंदर्भात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे हे अनेक आमदारांसह नॉट रिचेबल असल्याने भाजप नेत्यांकडून अनेक कमेंट केल्या जात आहेत. अशातच शिंदे यांनी आपला प्रस्ताव मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासंवर मांडला आहे. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी भाष्य केले आहे.

राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहीत पवार यांनी देखील प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, तो शिवसेनेचा अंतर्गत मामला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आम्ही जोडण्याचे काम करतो मात्र काही जण तोडण्याचे काम करतात असे म्हणत त्यांनी भाजपावर देखील निशाणा साधला आहे. आम्ही आमच्या नेत्यांच्या सोबत आहोत, ते जसे म्हणतील तसं करू असे रोहीत पवार यांनी म्हटले आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंड केलं असून शिंदे हे सध्या सुरतला असून, त्यांच्यासोबत शिवसेनेचे ३५ आमदार असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाकडून करण्यात येत आहे. यामुळे शिवसेनेच्या गोटात खळबळ माजली आहे. एकनाथ शिंदे हे भाजपमध्ये जाणार असल्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. मात्र दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्यांशी संपर्क झाला असून, राज्यात राजकीय भूकंप वगैरे काही येणार नसल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Team Global News Marathi: