“दुकानदाराकडे सध्या खायला पैसे नाहीत, पाट्या कशा बदलणार?

 

मुंबई | राज्यातील दुकानांच्या पाट्या आता मराठीत असणार आहेत. त्या संदर्भात ठाकरे सरकारने बुधवारी मंत्री मंडळाच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेतला होता. मात्र, या निर्णयानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून राजकीय पक्षांमध्ये श्रेयवादावरून राजकारण रंगले आहे. तर दुसरीकडे MIM चे खासदार इम्तियाज जलील यांनी थेट ठाकरे सरकरवर टीका केली आहे.

जलील म्हणाले की, गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे दुकानदार त्रस्त झाले आहेत. मोठा तोटा होत आहे. भविष्यात काय होईळ माहिती नाही, उद्या दुकाने आम्ही उघडू शकणार की नाही, लॉकडाऊन होणार का? अशी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत जर सरकार सांगत असेल की दुकानांच्या पाट्या बदलायच्या आहेत. सरकारला मराठीवर इतकं प्रेम आहे तर मग सरकारने आपल्या तिजोरीतील पैशांनी जितकी दुकाने आहेत त्या सर्वांच्या पाट्या तुम्ही बदला अशी मागणी करत खासदार इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारला सवाल केला आहे

त्या पाठोपाठ दुकानदार असोसिएशनचाही विरोध मराठी पाट्यांच्या या निर्णयाला फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनने सुद्धा विरोध केला आहे. असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शाह यांनी म्हटलं, मराठी पाट्यांच्या सक्तीच्या विरोधात २००१ साली मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरुन या निर्णयाला स्टे देण्यात आला होता. आम्हाला मराठीचा अभिमान आहे पण दुकानाची मोठी पाटी ही इंग्रजीत असायला हवी की मराठीत हा दुकानदाराचा निर्णय आहे.

Team Global News Marathi: