इंदुरिकर महाराज यांच्या अडचणी वाढणार, तृप्ती देसाईंनी केली अटकेची मागणी

 

पुणे | मागच्या काही दिवसापासून निवृत्ती महाराज इंदुरीकर अनेकदा वादग्रस्त वक्तव्य करत वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. दरम्यान इंदुरीकर महाराजांनी कोरोनाबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे राज्यभरातून महाराजांवर कारवाईची मागणी करत आहेत.तृप्ती देसाई यांनी इंदुरीकर महाराजांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.

इंदुरीकर महाराज म्हणाले होते की, “मी माळकरी आहे म्हणून मला कोरोना होणार नाही आणि ज्या लोकांनी कोरोनात माळा काढल्या त्यांना कोरोना गाठणारचं, असं कीर्तनाच्या माध्यमातून इंदुरीकर महाराजांनी सांगितलं होतं. त्यानंतर राज्यात वाद वाढला होता. मात्र पुढे आपली चुकी मान्य करून त्यांनी जालना जिल्ह्यातून कोरोना लसीबाबत जनजागृती करण्यास सुरुवात केली

मात्र दुसरीकडे भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी ठाकरे सरकारनं इंदुरीकर यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. इंदुरीकर आपल्या वक्तव्यामुळं राज्यात अंधश्रद्धा पसरवत आहेत.राज्य सरकार सुद्धा जनजागृती करत आहेच, परंतु स्वतःला कीर्तनकार म्हणविणारे इंदुरीकर पुन्हा एकदा असं वक्तव्य करून अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहेत, असं देसाई म्हणाल्या आहेत.

Team Global News Marathi: