मुंबईत कोरोना रोखण्यासाठी पालिकेचा मास्टर प्लॅन तयार

राज्यात विशेष करून मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. आज वाढत असलेली रुग्णसंख्या मुंबई मनपाच्या अडचणी अधिक वाढवताना दिसत आहे.  आज वाढत असलेली रुग्णसंख्या रोखण्याचे मोठे आव्हान मुंबई मानपासमोर उभे थाटले आहे याच पार्श्वभूमीवर आता मुंबई मनपाने मास्टर प्लॅन तयार केला आहे.

मुंबईतील मॉल्स, रेल्वे स्थानक, बस स्थानकांवर अँटिजेन चाचण्या होणार आहेत. तसेच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुंबईतील २५ प्रमुख मॉलमध्ये प्रत्येक ग्राहकाची अँटिजेन चाचणी केली जाणार आहे. ही चाचणी निगेटिव्ह आल्यानतंरच ग्राहकांना मॉलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.

मुंबईमध्ये असलेल्या प्रसिद्ध मॉलमध्ये दररोज हजारोच्या संख्येने लोक येत असतात. त्यामुळे संसर्गाचा धोका अधिक प्रमाणात वाढण्याची सहायता दिसून येत आहे. सुट्टीच्या दिवशी मुंबईतील सर्व मॉलमध्ये लाखो लोकांची गर्दी होते. त्यामुळे मुंबईतील मोठ्या मॉलमध्ये प्रवेशासाठी अँटिजेन चाचणी केली जाणार आहे. ही चाचणी बंधनकारक केल्यास आपोआप गर्दीला आळा बसेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

तसेच मुंबईतील बाहेरगावच्या रेल्वे येणारे ७ मुख्य रेल्वे स्थानकातही प्रवाशांच्या चाचण्या केल्या जाणार आहे. यात वांद्रे, दादर, बॉम्बे सेंट्रल, सीएसएमटी, कुर्ला, अंधेरी, बोरिवली या स्थानकांचा समावेश आहे.

Team Global News Marathi: