बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच भाजपामध्ये तिकिटाच्या मुद्द्यावरून तू-तू-मै-मै

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागलेले असताना आता राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. एकीकडे ममता बॅनर्जी यांना टक्कर देण्यासाठी भाजपाने पक्षातील नेत्यांना डावलून आयारामांना तिकिटाचे वाटप केले आहे. त्यामुळे भाजपा कार्यकर्ते नाराज झाले आहेत. हा मुद्दा आता स्थायिक कार्यकर्त्यांनी चांगलाच धरून ठेवला आहे.

गुरुवारी तिकीट वाटपाच्या मुद्द्यावरून भाजपामध्ये मोठा राडा झाला होता. बाहेरच्या लोकांना आणि सिनेकलावंतांना तिकीट दिल्यामुळे भाजपाचे कार्यकर्ते नाराज असून त्यांनी बंगालमधील अनेक शहरात रस्त्यावर उतरून निदर्शने सुरू केली आहेत. भाजपाने बंगालच्या अलीपूरद्वार विधानसभा मतदारसंघात अर्थतज्ज्ञ अशोक लाहिरी यांना तिकीट दिले होते. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

लाहिरी या बाहेरच्या व्यक्तीला तिकीट दिल्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केले आहे. यासच आम्ही लाहिरींना उमेदवारच मानत नाही, असे भाजपा कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्षांना सुनावले. त्यामुळे भाजपची एकच धावपळ उडाली. अखेर पक्षाने लाहिरी यांचं तिकीट कापून जिल्हा महासचिव सुमन कांजीलाल यांना तिकीट दिले.

Team Global News Marathi: