उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम भागात आरएसएस सुरु करणार शाखा |

 

उत्तर प्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक राहिलेले असताना सर्वच राजकीय पक्षाने कंबर कसली आहे. त्यात उत्तरप्रदेशातील मुसलील भागातील मतांवर डोळा ठेऊन आता आरएसएसने आता मुस्लीम बहुल भागांत शाखा सुरू करण्यावर भर दिला जाणार असल्याचे समजते.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या संघटनेत काही बदल केले असून, खांदेपालट करण्याचा निर्णय चित्रकूट येथील बैठकीत घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

क्षेत्र प्रचारक प्रदीप जोशी यांना अखिल भारतीय सह संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आता भैय्याजी जोशी यांना संघ आणि विश्व हिंदू परिषदेदरम्यानचे संयोजक असतील. तर, डॉक्टर कृष्ण गोपाल यांना विद्या भारतीचे प्रमुख संपर्क अधिकारी बनवण्यात आले आहे. तसेच अरुण कुमार यांना संघ आणि भाजपमध्ये समन्वय ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

कोरोना कालावधीत बंद पडलेले कार्यक्रम आणि शाखा पुन्हा सुरू करण्यावर भर देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला असून, विशेष म्हणजे आता देशभरातील मुस्लीम वस्त्यांमध्ये आपल्या शाखा सुरू करण्याचा निर्णय संघाने घेतल्याचे सांगितले जात आहे.

Team Global News Marathi: