वाहनचालकांना ‘नो टेन्शन’, ड्रायव्हिंग लायसन्स जवळ नसतानाही दंड नाही

 

मुंबई | आज प्रत्येकाच्या घराबाहेर दुचाकी किंवा चारचाकी उभी असलेली दिसते. गाडी म्हटले की ड्रायव्हिंग लायसन्स आलेच. मात्र बऱ्याचदा कामाच्या ताणात असताना आपण ड्रायव्हिंग लायसन्स घरी विसरून जातो आणि अशावेळी ट्राफिक पोलिसाने पकडल्यावर पावती फाडावी लागते. खिशाला तर झळ बसतेच शिवाय सर्वासमोर अपमानित झाल्याचीही भावना निर्माण होते. परंतु आता या सर्व झंझटीपासून सुटका मिळणार असून कागदपत्र स्वरुपामध्ये ड्रायव्हिंग लायन्स जवळ न बाळगताही तुम्हा दंड भरण्यापासून वाचणार आहात.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने १ ऑक्टोंबर २०२१ पासून कागदपत्र बाळगण्याबद्दल काही नियमात बदल केले आहेत. या नियमांपैकी एक म्हणजे आता लोकांना वाहन चालवताना ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसी सारखी अन्य महत्वाची कागदपत्रे व्यक्तिगत सांभाळण्याची गरज नाही आहे. रोड ट्रान्सपोर्ट मिनिस्ट्री यांनी मोटार वाहन नियम १९८९ संबंधित संशोधन केल्यानंतर आता ड्रायव्हिंग लायसन्स तयार करण्यापासून ते डॉक्युमेंट्स बाळगण्यापर्यंतच्या काही नियमात बदलाव केले आहेत.

वाहन संबंधित महत्वाची कागदपत्रे चालकाला आता शासकीय पोटर्ल्सवर अपडेट करता येणार आहे. केंद्र सरकारने वाहन चालकांसाठी ऑनलाईन पोर्टल Digilocker किंवा m-parivahan चा वापर करण्यास सांगितले आहे. येथेच वाहन चालकांना आपली कागदपत्रे अपोलड करता येणार आहेत. असे केल्यानंतर वाहन चालकांना आपली कागजपत्रे डिजिटल पद्धतीने एक्सेस करता येणार आहेत.

Team Global News Marathi: