अण्णा हजारेंचा उपोषण न करण्याचा निर्णय, ग्रामपंचायतीचा ठराव

 

मुंबई | ठाकरे सरकारने सुपरमार्केटमध्ये वाईन विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे 14 फेब्रुवारीपासून आंदोलन करणार होते. तर दुसरीकडेअण्णांनी उपोषण करू नये असा ग्रामसभेत ठराव करण्यात आला. वयाचा विचार करून अण्णांना उपोषण करण्याचा निर्णय मागे घेण्याची विनंती करण्यात आली. अण्णांनी ग्रामसभेचा ठराव मान्य केला आहे. त्यामुळे अण्णा आंदोलन करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

अण्णा हजारे आंदोलन करण्याच्या पार्श्वभूमीवर राळेगणसिद्धीत आज ग्रामसभा झाली. दरम्यान, यावेळी अण्णांनी उपोषण करू नये असा ग्रामसभेत ठराव करण्यात आला. अण्णांना वयाचा विचार करून उपोषण निर्णय मागे घेण्याची विनंती यावेळी करण्यात आली. अखेर अण्णांनी ग्रामसभेचा ठराव मान्य केला आहे.

काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने वाईन विक्रीसंबंधी जो धोरणात्मक निर्णय घेतला आहे, त्यानुसार सुपरमार्केट आणि किराणा दुकानांमधून वाईन विक्री सुरू करणे महाराष्ट्रासाठी अतिशय दुर्दैवी असल्याचे अण्णा हजारे यांनी म्हटले होते. केवळ राज्याचा वाढणारा महसूल आणि वाईन उत्पादक आणि विक्रेते यांचे हित पाहून हा निर्णय घेतल्याचे दिसून येते. पण या निर्णयामुळे लहान मुले तरुण व्यसनाधीन होऊ शकतो. महिलांना त्रास होऊ शकतो याचा विचार सरकारने केलेला दिसत नाही. याची खंत वाटत असल्याचे अण्णा हजारे यांनी राज्य सरकारला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

Team Global News Marathi: