बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, पायीवारीसाठी  ठाम असल्यामुळे पोलिसांनी केली कारवाई 

राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांना धुडकावून पाय वारीसाठी ठाम असलेल्या बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील दिघी पोलिसांनी आज पहाटे त्यांना ताब्यात घेत चऱहोली येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे. पायीवारीसाठी परवानगी द्या अशी मागणी त्यांनी केली होती.
 मात्र कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पायी वारीला परवानगी नाकारली. मात्र पायी वारी करणारच, अशी ठाम भूमिका घेत शनिवारी पहाटे काही वारकऱ्यांनी पायी वारी सुरू केली. त्यावेळी पोलिसांनी त्या वारकऱ्यांसह बंडातात्या कराडकर यांना ताब्यात घेतले. पायी वारी करू नये असे समजावून सांगण्याचा पोलिसांकडून प्रयत्न करण्यात आला.
आळंदी येथे पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांची तपासणी करण्यात आली होती. त्यात काही वारकऱ्यांना कोरोना संसर्ग झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे वारकऱ्यांनी आळंदी किंवा देहू येथे गर्दी करू नये, तसेच निर्बंधांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून केले होते. आळंदी आणि देहू येथे निर्बंध लागू केले असून, पोलिसांचा मोठा फौजफाटा तेथे बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला आहे.

 

Team Global News Marathi: