राज कुंद्राला अटक करण्याच खर कारण पोलिसांनी सांगितल !

 

मुंबई | पॉर्नफ्लीम प्रकरणी शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राला पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणी त्यांची पत्नी शिल्पा शेट्टी हिची सुद्धा चौकशी करण्यात आलेली आहे. तसेच कुंद्राच्या साथीदारांना सुद्धा अटक करण्यात आली असून बँक खात्यांची आता चौकशी सुरु करण्यात आली आहे. मात्र आता पोलिसांनी त्याला अटक करण्याचे खरे कारण सांगितले आहे.

अश्लील व्हिडीओ प्रकरणाच्या तपासामध्ये राज कुंद्रा सहकार्य करत नसल्यामुळे, त्याला अटक केल्याची माहिती मुंबई पोलिसांनी उच्च न्यायालयाला दिली आहे. राजनं पोलिसांनी आपल्याला अटक करण्यापूर्वी नोटीस बजावली नसल्याचा दावा न्यायालयात केला आहे. मात्र, पोलिसांनी हा दावा फेटाळला आहे.

पोलिसांनी हा दावा फेटाळत म्हटलं की, राज कुंद्राला आम्ही नोटीस बजावली होती, मात्र त्यांनं ही नोटीस स्विकारली नाही. म्हणजेच त्यानं पोलिसांच्या तपास कार्यात सहकार्य केलं नाही. राज कुंद्राची सध्या पोलीस चौकशी करत आहे. पण पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांना राज नीट उत्तरं देत नाही. आपण या प्रकरणातून सहजपणे बाहेर पडू अशी राजला खात्री असल्यानं तो पोलिसांना मदत करत नसल्याचं म्हटलं जात आहे. मात्र राज कुंद्राविरोधात आमच्याकडे ठोस पुरावे आहेत. त्यामुळे या प्रकरणातून त्याची सुटका होणं कठीण असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

Team Global News Marathi: