‘सर्व प्रियजनांना आणि नॉटी जनांना; मिसेस फडणवीसांचा राऊतांना नाव न घेता टोला

 

मुंबई | कोरोनाच्या निर्बंधांनंतर यंदा राज्यात मोठ्या जल्लोषात धुळवड साजरी करण्यात आली. सर्वसामान्यांसह नेते मंडळींनीही उत्साहाने धुळवड साजरी केली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी धुलीवंदनाचे खास फोटो शेअर केले आहेत. मात्र यावेळी सुद्धा धुलीवंदनाच्या शुभेच्छा देताना त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

अमृता फडणवीस यांनी धुलवडीच्या फोटोंना ‘नॉटी’ कॅप्शन देत शिवसेना खासदार संजय राऊत यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. सर्व प्रियजनांना आणि ‘नॉटी’ जनांना होळीच्या हार्दीक शुभेच्छा, असं कॅप्शन देत अमृता फडणवीसांनी धुळवडीचे फोटो शेअर केले आहेत. अमृता फडणवीस यांनी यापूर्वीही नॉटी शब्दाचा उल्लेख करत राऊतांवर निशाणा साधला होता.

 

अभिनेत्री कंगना रनौत व संजय राऊत यांच्यात काही दिवसांपूर्वी चांगलाच वाद रंगला होता. यावेळी कंगनावर टीका करताना संजय राऊतांनी नॉटी शब्दाचा उल्लेख केला होता. कंगना नॉटी गर्ल असल्याचं संजय राऊत एका मुलाखतीत म्हणाले होते. त्यानंतर राऊतांवर चौफेर टीका देखील झाली होती.

यापूर्वी सुद्धा अमृता फडणवीस यांनी राऊतांना नॉटी शब्दावरून ट्रोल केलं होतं. त्यानंतर त्यांनी पुन्हा त्यांच्या कॅप्शनमध्ये नॉटी शब्दाचा उल्लेख केला आहे. त्यामुळे अमृता फडणवीसांनी ट्विट करत राऊतांवरच निशाणा साधला असल्याचं म्हटलं जात आहे.

Team Global News Marathi: