टीएमसीचे ३८ आमदार भाजपच्या संपर्कात; मिथुन चक्रवर्ती यांचे खळबळजनक विधान

 

पेशाने अभिनेता असलेले आणि काही दिवसांपूर्वी भाजपात प्रवेश केलेले मिथुन चक्रवर्ती यांनी केलेल्या एका दाव्यामुळे पश्चिम बंगालसह देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमधील ३८ आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा चक्रवर्ती यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. या ३८ पैकी २१ आमदार थेट आपल्या संपर्कात असल्याचेही चक्रवर्ती यांनी म्हटले आहे.

मिथुन चक्रवर्ती गेल्या वर्षीच भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेत हा खळबळजनक दावा केला आहे. भाजप मुस्लीमविरोधी असल्याचा आरोप करण्यात येतो. तसेच भाजपकडून दंगे घडवले जातात, असेही आरोप होतात. मात्र, यात काहीही तथ्य नाही. भाजपची प्रतीमा मलीन करण्याचा हा डाव असल्याचे त्यांनी सांगितले.

देशातील तीन मोठे सुपरस्टार सलमान खान, शाहरुख खान आणि आमीर खान मुस्लीम आहेत. देशातील 18 राज्यात भाजपचे सरकार आहे. भाजप त्यांच्याशी द्वेष करत असेल तर या राज्यातून या सुपरस्टार्सना लोकप्रियता कशी मिळते, असा सवालही त्यांनी केला. आज आपण या पदापर्यंत वाटचाल केली आहे. त्यात सर्वधर्मीयांनी आपल्याला दिलेले प्रेमाचे आणि स्नेहपूर्वक वागणुकीचे मोठे योगदान आहे.

कोणी काहीही गैरवर्तवणूक किंवा भ्रष्टाचार केला नसेल तर तपास यंत्रणांना घाबरण्याची गरज नाही. मात्र, काही चुकीचे केले असेल तर त्यांनी कोणतीही शक्ती वाचवू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. पश्चिम बंगालमध्ये ईडी कारावाईबाबत त्यांनी हे मत व्यक्त केले. मात्र, तृणमूल काँग्रेसचे 38 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याच्या त्यांच्या दाव्याची चर्चा होत आहे.

“शेतकऱ्यांना मोठा दिलासा, वीज दर प्रति युनिट एक रुपयांनी स्वस्त”

टायगर श्रॉफ-दिशा पटानीचं ब्रेकअप, तब्बल ६ वर्षांनी संपवल नातं

Team Global News Marathi: