तिरंगा सन्मान बाईक रॅलीला तरुणांचा उदंड प्रतिसाद

 

स्तंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस आधी लोकसभेतील शिवसेना गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी आयोजित केलेल्या ‘ तिरंगा सन्मान ‘ बाईक रॅलीला तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळाला. मानखुर्द येथून सुरू झालेल्या या बाईक रॅलीची दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे सांगता झाली. या रॅलीत स्वतः खासदार शेवाळे बाईक चालवत सामील झाले होते. ही बाईक रॅली सुरू होण्याआधी दिवंगत माजी आमदार विनायक मेटे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘ हर घर तिरंगा ‘ अभियानाची घोषणा करण्यात आली. याचं पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस आधी खासदार राहुल शेवाळे यांनी दक्षिण – मध्य मुंबईत तिरंगा सन्मान रॅली आयोजित केली होती. या रॅलीत सुमारे एक हजार बाईकस्वार सामील झाले होते. सकाळी 11 च्या सुमारास मानखुर्द येथून सुरू झालेली बाईक रॅली सायन – पनवेल महामार्गावरून परेल – प्रभादेवी मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे पोहोचली. यानंतर वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन खासदार शेवाळे यांनी अभिवादन केले. या बाईक रॅली मध्ये दक्षिण – मध्य मुंबईतील तरुण मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते .

तिरंगा सन्मान रॅली मध्ये चिमुकल्यांनी देखील उत्साहाने सहभाग नोंदवला. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, पंडित जवाहरलाल नेहरू, झाशीची राणी, भारतमाता या महान विभूतींच्या वेशभूषा परिधान करून आलेल्या बच्चे कंपनीने या तिरंगा रॅलीची शोभा वाढवली.

Team Global News Marathi: