टाईमपास 3 ने चार दिवसात जमावाला इतक्या कोटींचा गल्ला

 

मुंबई : रवी जाधव यांच्या दिग्दर्शनाने रंगलेल्या ‘टाईमपास 3’ ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असून अवघ्या चार दिवसांमध्ये 4.36 कोटींची कमाई करून आपली यशस्वी घोडदौड सुरू ठेवली आहे.

सध्या पालवीची डॅशिंग, लव्हेबल अदा, दगडूची जबरदस्त कॉमेडी आणि त्यात भर म्हणून दगडूची गँग प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे.झी स्टुडिओजचे व्यवसायप्रमुख मंगेश कुलकर्णी चित्रपटाविषयी म्हणतात, ‘अवघ्या चार दिवसांमध्ये 4.36 कोटींची कमाई करून बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे.

सध्या हिंदी सिनेमांचा प्रेक्षकांवर पडलेला प्रभाव बघता दगडू आणि पालवीच्या प्रेमाला प्रेक्षकांचा इतक्या कमी दिवसांत इतका उत्साहजनक प्रतिसाद पाहून अभिमान वाटतो. ‘टाईमपास 1’ आणि ‘टाईमपास 2’ ला जितका प्रतिसाद मिळाला तितकाच प्रतिसाद प्रेक्षक ‘टाईमपास 3’लाही देत आहेत. चित्रपट पाहून समीक्षक आणि प्रेक्षकांच्यादेखील सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत.

Team Global News Marathi: