“वेळ आली कि माकडीण पिल्लालाही पायाखाली घेते हि यांची संस्कृती”; पाटलांची नाव न घेता पवारांवर टीका

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने जोरदार झटका दिला आहे. ईडीने पहाटेच नवाब मलिक यांच्यावर कारवाई केली व चौकशीसाठी ताब्यात घेतलं. नवाब मलिकांवरील कारवाईनंतर राजकारण चांगलच ढवळून निघालं असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक उडालेली पाहायला मिळत आहे. अशातच आता या कारवाईवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पाटील म्हणाले की, ‘गेल्या 50 वर्षापासून शरद पवारांकडून राजकारण केले जात आहे. त्यांचे हे राजकारण सर्वांना माहीत आहे. समाजात जातीयवाद निर्माण करण्याचा प्रयत्न पवारांकडून केला जात आहे. ‘वेळ आली कि माकडीण पिल्लालाही पायाखाली घेते हि तर याची संस्कृती आहे,’ अशी टीका पाटील यांनी पवार यांच्यावर नाव न घेता केली.

चंद्रकांत पाटील यांनी आज पुणे येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, ‘ईडीच्या नोटिसीला महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी घाबरू नये. राज्य सरकावरही टीका करताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, सध्या जेलमध्ये असलेले अनिल देशमुख यांनी नुकतेच एक विधान केले आहे की, ‘मला तोंड उघडायला लावू नका. मी जर तोंड उघडले तर…,’ असे देशमुख यांनी म्हंटले आहे.

 

Team Global News Marathi: