वानखेडेंच्या माध्यमातून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र नवाब मलिकांची नाव न घेता भाजपवर टीका

 

मुंबई | कोर्डेलिया क्रुझवर एनसीबीने छापा टाकून अभिनेता शाहरुख खान याच्या मुलाला अटक केली होती. त्यानंतर काल आर्यनला जामीन मंजूर करण्यात आला. तर एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांची चौकशी केली जात आहे. यावरून राष्ट्रवादी पक्षाचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला. समीर वानखेडे यांच्या माध्यमातून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले गेले. भाजपची काही लोक वानखेडेंची भेटही घेत असल्याचे मलिक यांनी सांगितले.

नवाब मलिक यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, जो व्यक्ती आर्यनला तुरुंगात घेऊन जात होता. तो तुरुंगात आहे. २ तारखेनंतर परिस्थिती बदलली. जो व्यक्ती आर्यनला जामीन मिळू नये म्हणून शक्तीपणाला लावत होता. तो काल कोर्टात दाद मागत होता. पोलिसांनी जी चौकशी सुरू केली आहे, ती सीबीआय किंवा एनसीबीकडे द्या म्हणत होता.

पुढे बोलताना ते म्हणाले की, मी त्यांच्या पहिल्या पत्नीचा ट्विटरवर फोटो टाकला, पण त्यांच्या दुसऱ्या पत्नीबद्दल एका शब्दानेही बोललो नाही. माझी लढाई कुणाच्या कुटुंबाविरोधात नाही, लढाई ही अन्यायाविरोधात आहे. आता परिस्थिती पूर्ण बदलली आहे. पिक्चर अभी बाकी है, संपूर्ण सिक्वेन्स बदलला आहे. धरपकड करणारे आता बचावाचा मार्ग शोधत आहे. म्हणून मी काल म्हटलं पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त असे सूचक विधान त्यांनी केले आहे.

Team Global News Marathi: