शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोरोनाचे जंतू कोंबण्याच्या विधानावरून भाजपा आमदार संजय कुठे यांनी आमदार गायकवाड यांच्या विधानाचा निषेध करत त्यांचा पुतळा जाळला होता. आता याच पार्श्वभूमीवर आ. संजय गायकवाड यांनी आ. कुठे यांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे.
संजय कुटेसारखा तीनपाट आमदार जो दिवसभर दारु पिऊन वावरात पडलेला असतो. अरे हरामखोर पुतळे काय जाळतो, जर हिंमत असेल तर माझ्या जवळ येऊन दाखव. मग मी काय आहे ते दाखवतो असे आव्हान गायकवाड यांनी कुठे यांना दिले आहे. यावेळी संजय गायकवाड यांनी अत्यंत शेलक्या शब्दांत भाजप आमदार संजय कुटे यांच्यावर टीका केली होती. ते बुलढाणा येथे बोलत होते.
पुढे बोलताना गायकवाड म्हणाले की, वाढता कोरोना, केंद्र सरकारने न केलेली मदत, ऑक्सिजनचा तुटवडा यावर मी एक व्हिडीओ बनवला होता. त्यावर भाजपकडून माझा पुतळ्याची जाळपोळ करण्यात आली. पण माझा यात काय दोष आहे? मी फक्त यावरची वस्तूस्थिती मांडली. केंद्राने मदत करायला हवी, ऑक्सिजन द्यायला हवा, रेमडेसिव्हीर दिलं पाहिजे. मात्र राज्यात आज फक्त शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. राष्ट्रवादी-काँग्रेसचे सरकार आहे. म्हणून केंद्र हे पुरवत नाही.