मतमोजणी केंद्राकडे जाणाऱ्या गाडीत सापडले हजारो बॅलेट पेपर!

 

नवी दिल्ली | निवडणुकीच्या निकालांकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं असताना आझमगडमध्ये मतमोजणी केंद्राकडे जात असलेल्या एका गाडीत हजारो बॅलेट पेपर सापडले आहेत. हे सापडल्यानंतर आता समाजवादी पार्टीने मोठा गोंधळ घातला आहे.त्यामुळे निवडणुकीच्या निकालापूर्वी उत्तरप्रदेशातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे.

मिळालेल्य़ा माहितीनुसार, आझमगडच्या पाच विधानसभा क्षेत्रातून आलेले ईव्हीएम मशीन बेलईसामधील स्ट्राँग रुममध्ये ठेवली आहे. मात्र बुधवारी रात्री जवळपास दहा वाजता एका पोस्टल बॅलेटच्या एआरओच्या सरकारी वाहनामध्ये काहीही उपयोग नसताना आणले गेलेले बॅलेट पेपर सापडले आहेत. बॅलेट पेपरचा बंडल सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

बॅलेट पेपर पाहताच समाजवादी पक्ष प्रचंड संतापली आणि त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. गाडीला घेरलं आणि शिवीगाळ सुरू केली. या गोंधळाची महिती मिळताच डीएम अमृत त्रिपाठी व एसपी अनुराग आर्य हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी याचा तपास केला असता हा एआरओचा निष्काळजीपणा असल्याचं समोर आलं आहे.

एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. एक्झिट पोल प्रसिद्ध झाल्यानंतर समाजवादी पक्षाची प्रतिक्रिया समोर आली आहे. भाजपाचा विजय होईल, असे जनमानस तयार करण्यासाठी एक्झिट पोल तयार करण्यात आले आहेत. तसेच निवडणूक अधिकाऱ्यांकडून ईव्हीएमशी छेडछाड करण्यात येत असल्याचा आरोपही अखिलेश यादव यांनी केला.

Team Global News Marathi: