“भाजपा लोकशाहीचा नाश करतेय, ईव्हीएममध्येही गैरव्यवहार” सपा नेत्याची घणाघाती टीका

 

नवी दिल्ली | उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून, २०१ जागांसाठी कल हाती आले आहेत. यामध्ये भाजप १२८ जागांसह आघाडीवर आहे. तर सपा ६९ जागा, बसप, ०२, अन्य ०२ वर आहेत.काँग्रेस पक्षाला अजूनही खाते उघडता आले नाही.

उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा भाजपाची सत्ता येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच दरम्यान समाजवादी पार्टीच्या नेत्याने भाजपावर काही गंभीर आरोप केले आहेत. “ईव्हीएममध्ये गैरव्यवहार झाला असून, भाजपा लोकशाहीचा नाश करत आहे” असं म्हणत जोरदार हल्लाबोल केला आहे.

लखनऊचे सपा नेते नरेश उत्तम पटेल यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. “भाजपा लोकशाहीचा नाश करत आहे. काही ठिकाणी बॅलेट पेपर पकडण्यात येत आहे. तर काही ठिकाणी ईव्हीएममध्ये छेडछाड करण्यात आली आहे. जनतेने यावेळी भाजपाचं खोटं संपवण्याचा निर्णय घेतला आहे” असं पटेल यांनी म्हटलं आहे.

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी मतमोजणी सुरू झाल्यावर एक ट्विट केले असून, मतमोजणी केंद्रांवर सपाचे कार्यकर्ते सतर्क राहतील. मतमोजणी केंद्रांवरील अधिकारी वर्गाला आणि पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा, असे म्हणत इम्तिहान बाकी है अभी हौसलों का, वक़्त आ गया है अब ‘फ़ैसलों’ का, असं ट्विट केलं आहे.

Team Global News Marathi: