ज्यांना हायकोर्टात जायचं त्यांनी खुशाल जावं दमानिया यांना छगन भुजब यांचे प्रतिउत्तर !

मुंबई | दिल्लीतील कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणाी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. मात्र या निर्णयाविरोधात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपण याप्रकरणी हायकोर्टात जाऊ, असा इशारा दिला आहे.

दरम्यान यावर मंत्री छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकशाही आहे, त्यांनी खुशाल हायकोर्टात जावं. आम्ही अधिक उजळ माथ्याने समोर येऊ, असं छगन भुजबळ यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी हिंदीतला एक शेरही म्हटला. मेरे खिलाफ होनेवाली बातो को मैं अक्सर खमोशी से सूनता हुँ, जवाब देने का हक मैने वक्त को दे रखा है, अशा शब्दात छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुढे बोलताना भूजबळ म्हणाले की, आम्ही जास्त बोलत असल्याने कदाचित लोकं दुखावत असतील. पण आम्ही राजकारणामध्ये विचाराची लढाई लढतो. त्यामुळे आम्ही सत्य मांडतो. पण माणसं दुखावली जातात. हल्ली अलिकडे हे जास्तच व्हायला लागलं. लोक पटदिशी दुखावतात आणि हातात असलेल्या सत्तेचा ताबडतोब गैरवापर करायला सुरुवात करतात, असं म्हणत भुजबळांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

Team Global News Marathi: