मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्यानी नरेंद्र मोदींना देखील देश पालथा घालण्यास सांगण्याचे धाडस करावे-संजय राऊत

मुंबई : कोरोनाच्या संकटात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मातोश्रीवरून कारभार चालवत असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहेत तर राज्याच्या इतिहासात सर्वाधिक काळ घरात राहणारे आणि जनतेत न जाणारे मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे यांचा उल्लेख करावा लागेल अशी टीका करणारे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचा समाचार शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी घेतला आहे.

राज्याच्या इतिहासात सर्वाधिक काळ घरात राहणारे आणि जनतेत न जाणारे मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे यांचा उल्लेख करावा लागेल कारण राज्यामध्ये कोविडसारखे महाभयंकर संकट आले तरी मातोश्री सोडून मुख्यमंत्री ठाकरे कधीही बाहेर जनतेत गेले नाहीत. आक्रोश झाल्यांनतर एखाद्या ठिकाणी बाहेर पडले असतील अशी टिका विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी काल केली होती.

या टीकेचा खरपूस समाचार शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी घेतला आहे.राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाच्या पद्धतीवर बोट ठेवणा-यांना देखील चांगलेच सुनावले. मुख्यंत्र्यांवर टीका करणा-यांनी सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील देश पालथा घालण्यास सांगण्याचे धाडस करावे.पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्या कामाची पद्धत सारखी आहे. प्रादुर्भाव वाढत आहे हे लक्षात घेता अशा परिस्थितीत मुख्यमंत्री गेले तर गर्दी होते.राष्ट्रपती, पंतप्रधान प्रोटोकाल तोडत नाही तर मुख्यमंत्र्यांनी का तोडावा”, असे प्रत्युत्तर संजय राऊत यांनी टीकाकारांना दिले आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता संसर्ग ही चिंतेची बाब ! मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली काळजी

राज्य सरकारने अधिका-यांच्या केलेल्या बदल्या हा विषय विरोधकांसाठी कळीचा मुद्दा बनला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकार बदल्यांचा धंदा करत असल्याचा आरोप केला आहे. शिवसेना खासदार संजय राउत यांनी विरोधकांच्या या टीकेला प्रत्युत्तर देत नवीन सरकार आल्यानंतर बदल्या करू नये, असे घटनेत लिहिले आहे का?, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे.

आता ग्रामीण भागातील घरांच्या मालमत्तेवर ग्रामस्थांना मिळणार कर्ज; वाचा सविस्तर

प्रसारमाध्यमांसी संवाद साधताना त्यांनी यावेळी विविध मुद्यांवर भाष्य केले. नवीन सरकार आल्यानंतर बदल्या करू असे घटनेत लिहिले आहे का?, बदल्या करू नका असे कुठे लिहून ठेवले आहे. तुमच्याच लोकांना वर्षानुवर्षे ठेवून राज्य करावे का?, बदल्या काय फक्त आम्हीच केल्या आहेत का ?”, असे सवाल राऊतांनी यावेळी उपस्थित केले.तर बदल्या या राज्याच्या हितासाठी असतात आणि तो करण्याचा अधिकार सरकारला आहे, असे संजय राऊत म्हणाले.

कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा तर किनारपट्टीलगत सोसाट्याच्या वाऱ्याचा अंदाज

मंदिरे खुली करण्याच्या मुद्यावर बोलताना देखील संजय राऊत यांनी विरोधकांसह जनतेला संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. मंदिरे उघडावीत अशी मुख्यमंत्र्यांची देखील मनापासून इच्छा आहे. योग्यवेळी ते निर्णय घेतील. सगळे बंद करण्याची त्यांना हौस नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. लोकांच्या जीवाशी खेळ होऊ नये, अशी भावनी मुख्यमंत्र्याची असेल तर ती समजून घेतली पाहिजे. विरोधकांनी मुख्यमंत्र्यांशी थेट चर्चा केली पाहिजे. संयम बाळगणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: