WhatsApp Time | तुमचं चॅटिंग कोणीच वाचू शकणार नाही | भन्नाट सेटिंग फीचर्स ; वाचा सविस्तर-

WhatsApp Time | तुमचं चॅटिंग कोणीच वाचू शकणार नाही | भन्नाट सेटिंग फीचर्स ; वाचा सविस्तर-

मुंबई, ४ सप्टेंबर : व्हाट्सअँप आज प्रत्येक सामान्य माणूस ते श्रीमंतांपासून सर्वाच्याच आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. तुमच्या व्हाटसअँप’मध्ये अनेक ओळखीची लोकं, मित्रमंडळी, नातेवाईक ते घरातील माणसं असे सर्वच संपर्कात असतात. मात्र यातील सर्वांशीच तम्ही तुमच्या खाजगी गोष्टी शेअर करू इच्छिता असं नाही. त्यामुळे अनेकांना आपण काही गोष्टींपासून थोडं लांबच ठेवणं पसंत करतो. त्यासाठीच व्हाट्सअँप’मध्ये काही भन्नाट फीचर्स आहेत जे अनेकांना आजही माहित नाहीत.

टू-स्टेप ऑथेंटिकेशन:

टू-स्टेप ऑथेंटिकेशन व्हॉट्सअ‍ॅपवर सिक्योरिटीची एक्स्ट्रा लेयर देतं. यासाठी युजरला एक पिन सेट करावा लागेल. व्हॉट्सअ‍ॅपच्या सेटिंगमध्ये अकाऊंटमध्ये जाऊन Two-Step verification वर टॅप करावे लागेल. या ठिकाणी Enable वर क्लिक करून Pin सेट करा.

Read Receipts बंद करा:

Read Receipts मुळे समोरच्या व्यक्तीला तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप मेसेज वाचला आहे की नाही, हे समजत नाही. म्हणजेच मेसेज वाचल्यानंतरही ब्लू टिक होत नाही. तसेच व्हॉट्सअ‍ॅपच्या सेटिंग्समध्ये जाऊन अकाऊंटमध्ये जा. या ठिकाणी Privacy च्या आत Read Reciepts चा पर्याय दिसेल. तो टर्न ऑफ करा.

फिंगरप्रिंट लॉकचा करा वापर:

व्हॉट्सअ‍ॅपसाठी फिंगरप्रिंट लॉकचा वापर करता येतो. यासाठी व्हॉट्सअ‍ॅप सेटिंग्समध्ये जाऊन Privacy ऑप्शनमध्ये जावे लागेल. या ठिकाणी खाली दिलेल्या Fingerprint Lock चा ऑप्शन दिसेल. याला इनेबल करा यानंतर कोणीही तुमचं व्हॉट्सअ‍ॅप ओपन करू शकणार नाही.

चॅट बॅकअप करा बंद:

चॅट डिलीट केल्यानंतर ते परत मिळवण्याचा फायदा चॅट बॅकअपमुळे होतो. मात्र ते गुगल आणि अ‍ॅपल अकाउंट्सवर सेव्ह होतात. त्यामुळे ते हॅक होण्याचा धोका असतो. त्यामुळे चॅट ऑटो बॅक अप बंद करा. यासाठी सेटिंगमध्ये जा. त्यानंतर चॅट्स ऑप्शन निवडा. या ठिकाणी Chat Backup वर क्लिक करा आणि Backup to Google Drive मध्ये जाऊन Never सिलेक्ट करा.

ग्लोबल न्युज नेटवर्क: