हे एक नंबरच लबाड सरकार,भाजपा प्रादेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांची आघाडी सरकारवर टीका

पुणे: एमपीएसी परीक्षेची तारीख राज्य सरकारकडून पुढे ढकलण्यात आल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. पुणे, नागपूर, कोल्हापूर, संभाजीनगर, नाशिक आदी शहरांत एमपीएससी परीक्षार्थी रस्त्यावर उतरले होते. यावर आता भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. ते आज पुणे येथे बोलत होते.

या सरकारमध्ये बेबंदशाही चालू आहे. त्याचं उदाहरण म्हणजे प्रत्येक मंत्री सतत वेगवेगळी भूमिका मांडताना दिसून येतात. यातून या सरकारमधील मंत्र्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा ताळमेळ दिसून येत नाही. सरकारमधील प्रत्येक घटक वेगळी भूमिका मांडतो. हे एक नंबर लबाड सरकार आहे अशा शब्दात चंदकांत पाटील यांनी टीका केली आहे.

पुढे बोलताना पाटील म्हणाले की, “तुम्ही परीक्षेची तारीख जाहीर करणार म्हटलात पण विद्यार्थ्यांनी तुमच्यावर का विश्वास ठेवायचा?,” असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे. तसेच हे सरकार विद्यार्थ्यांपासून शेतकरी वर्गापर्यंत कोणतेही प्रश्न सोडवण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे अशा शब्दांत त्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली होती.

Team Global News Marathi: