सध्या मार्केटमध्ये अनेक प्रकारच्या दोन चाकी उपलब्ध आहेत. मात्र त्यांच्या किमती ५० हजार रुपयापासून ते १५ लाखांपेक्षा जास्त किमतीने उपलब्ध आहे. पण आता कमी किमतीत तुम्हाला स्वतःची बाईक घेता येणार आहे. विश्वास बसत नाही तर आता ३९,९९९ किमतीमध्ये स्वतःची बाईक घेता येणार आहे.
इलेक्ट्रिक व्हीकल स्टार्टअप डिटलने इजी प्लस इलेक्ट्रिक दोन चाकी गाडी बाजारात आणली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत फक्त ३९,९९९ इतकी रुपये ठेवण्यात आली आहे. इतक्या कमी किंमतीत ते जगातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर बनवण्याचा कंपनीचा दावा आहे.
सध्या कंपनीने या दोन चाकी गाडीसाठी बुकिंग सुरु केली आहे. आपणास ही गाडी हवी असल्यास २००० रुपयात बुक करता येणार आहे. तसेच आपण ऑनलाइन पद्धतीने सुद्धा बुक करू शकता अशी व्यवस्था कंपनीने केली आहे.
स्कूटरमध्ये 250 डब्ल्यू इलेक्ट्रिक मोटर आणि 48 व्ही 12 एएएच LiFeP04 (लिथियम आयन फॉस्फेट) बॅटरी दिली गेली आहे. यास 6 ते 7 तासांमध्ये चार्ज केले जाऊ शकते. या स्कूटरवर कंपनीकडून 2 वर्षाची प्रमाणित वॉरंटी मिळत आहे, जी 40,000 किमी पर्यंत वैध आहे. या स्कूटरला प्रीपेड रोडसाइड असिस्टेंस पॅकेज आणि विनामूल्य हेल्मेट मिळत आहे.
या स्कूटरद्वारे आपल्याला सिंगल चार्जमध्ये 60 किमीची रेंज मिळते. स्कूटरची लोड क्षमता 170 किलो आहे. स्कूटरची ग्राउंड क्लीयरन्स 170 मिमी आहे. स्कूटरची टॉप स्पीड 25 किमी प्रतितास आहे. खरेदीदारांना हे स्कूटर 5 कलर ऑप्शन्समध्ये मिळत आहे. हे मेटलिक ब्लॅक, मेटलिक रेड, मेटलिक यलो, गनमेटल आणि पर्ल व्हाइट कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करता येईल.