हे महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात लबाड सरकार! देवेंद्र फडणवीसांची घणाघाती टीका

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकार आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली होती.यावर आघाडीच्या अनेक निर्णयावर त्यांनी बेछुड आरोप केले होते

महाराष्ट्राच्या आजवरच्या इतिहासामधले सर्वात लबाड सरकार हे आज आम्हाला पहायला मिळाले. ठाकरे सरकारचं नाव हे लबाड सरकार म्हणून लिहील जाईल. याचे कारण असे की अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मोठ्या थाटामाटात घोषित करायचे की, शेतकऱ्यांचे जे काही विजेचे मीटर आहेत कनेक्शन आहेत ते कापण्यावर आम्ही स्थगिती दिली आहे आणि शेवटच्या दिवशी ती स्थगिती उठवायची. ही सर्वात मोठी लबाडी आहे. ही स्थगिती उठवताना दिली गेलेली कारणे पूर्णपणे चूकीची आहेत असा घणाघाती आरोप फडणवीसांनी लगावला होता.

पुढे फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना, सामान्य नागरिकांना ठाकरे सरकारने आज विजेचा शॉक दिला आहे आणि म्हणून हे लबाड सरकार आहे. ज्या शेतकऱ्याला बांधावर जावून कर्जमुक्त करतो हे या लबाड सरकारने सांगितले होते. २५००० रूपये देतो म्हणुन आश्वासन दिलं होतं. त्या शेतकऱ्याला एक नवा पैसा दिला नाही असा आरोप फडणवीसांनी लगावला होता.

 

Team Global News Marathi: