‘ही वेळ राजकारणाची नाही’; मुंब्र्यात गेलेल्या किरीट सोमय्यांना शानू पठाण यांनी पिटाळून लावले

कौसा-मुंब्रा : प्राईम रुग्णालयात झालेल्या दुर्घटनेनंतर माजी खासदार किरीट सोमय्या यांनी घटनस्थानी भेट देऊन महविकास आघाडी सरकाराच्या नेत्यावर जरूरदार टीका केली होती. एकीकडे लोक मदत कार्यकारत असताना त्याठिकाणी येऊन सुद्धा राजकारण करणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्या यांना विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांनी चांगलेच झापले होते. तसेच तेथून जाण्याची विनंती सुद्धा केली होती.

या घटनेवर बोलताना पठाण म्हणाले की, “आम्ही जनतेचे जीव वाचविण्याला महत्व देत आहोत. प्रत्यक्ष मदतीच्या वेळी घरात बसणारे येथे येऊन राजकारण करीत असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही. ही वेळ राजकारणाची नाही. जगलो तर राजकारण करुच; पण, टीका करण्यापूर्वी हिम्मंत असेल तर केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मदत मिळवून दाखवा, अशा शब्दात शानू पठाण यांनी सोमय्यांना खडेबोल सुनावले होते.

प्रकार असे की, कौसा येथील जळीत कांडानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी घटनास्थळी येऊन आघाडीच्या नेत्यावर जोरदार टीका केली होती. त्यावेळी घटनास्थळी मदतकार्य करणारे शानू पठाण हे प्रचंड संतप्त झाले. त्यांनी सोमय्या यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत त्यांना सदर ठिकाणाहून पळवून लावले लावले. त्यामुळे कोविड रुग्णालयात जाण्याचा प्रयत्न करणार्‍या सोमय्या यांना परत परतावे लागले होते.

आज दुर्घटनेनंतर राजकारण करण्यासाठी सोमय्या येथे आले आहेत. जेव्हा मुंब्रा-कौसा भागात अनेक लोक मरत होते, तेव्हा हे कुठे होते? रात्री आग लागलेल्या आगीत जीवाची पर्वा न करता आम्ही रुग्णांना सुरक्षितस्थळी हलविले ; त्यावेळी सोमय्या कुठे होते. डॉ. जितेंद्र् आव्हाड हे दिवसरात्र काम करीत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदेशानुसार आम्ही कोरोना रुग्णांना मदत करीत आहोत. आता हे लोक येऊन टीका करीत आहेत. अशी फुकटची टीका आम्ही सहन करणार नाही.

Team Global News Marathi: