सेनापती कधी युद्धभूमीवर जाऊन बसत नाही – संजय राऊत !

सध्या महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती हाताळण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यश येताना दिसत आहे. त्यात महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येचा वेग मंदावताना दिसत आहे, याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाष्य करत मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सतत बैठका घेऊन आणि चर्चा करून कोरोनाबद्दलची सूत्र आपल्या हाती ठेवली आहेत.

आज कोणत्याही युद्धात पंतप्रधान, राष्ट्रपती किंवा सेनापती स्वत: रणभूमिवर जाऊन बसत नाहीत. ते त्यांच्या वॉररूममध्ये बसून संपूर्ण यंत्रणा राबवतात. त्यातूच ते राज्याला किंवा देशाला विजयाकडे नेतात. सध्या राज्यात रूग्ण संख्या ज्या पद्धतीने कमी होतेय त्याचे श्रेय मुख्यमंत्री उद्धव ठाके यांना द्यावे लागेल. ते ज्या प्रकारे एका जागी बसून यंत्रणा हातळत आहेत, त्याचं हे श्रेय आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी टीका करणं बंद केलं पाहिजे”, अशा शब्दात संजय राऊत यांनी विरोधकांना फटकारले आहे.

देशाची परिस्थिती गंभीर आहे. काही राज्यांनी सुरूवातीपासून टेस्टिंग केलं नाही. त्यामुळे आता ही लाट उसळली आहे. उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल ही मोठी राज्ये आहेत. या राज्यातून आकडे येण्यास आता सुरूवात झाली आहे. मुंबईसारख्या मोठ्या शहरात आता कोरोना रूग्णसंख्या निम्म्यावर आली आहे. त्याचं कारण मुख्यमंत्री आणि त्यांचे इतर सहकारी गावपातळीपर्यंत खोलात जाऊन या यंत्रणेची नीट अमलबजावणी होते की नाही, ते पाहत आहेत असे सुद्धा त्यांनी बोलून दाखविले होते.

Team Global News Marathi: