ही नॅशनल दुर्घटना नाही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे धक्कादायक विधान !

मुंबई : विरारमधील रुग्णालयात आग लागून झालेल्या घटनेत १३ रुग्णांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली अर्पण करून सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश संबंधित खात्याला दिले आहेत. तसेच उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना झळ पोहचू नये याकडे लक्ष देत त्यांची लगेचच इतरत्र व्यवस्था करावी असे निर्देश देण्यात आले आहेत.

मात्र या घटनेवर आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी धक्कादायक विधान केले आहे. आता त्यांच्या या विधानावरून नवा वाद निर्माण होण्याचे चिन्ह दिसून येत आहे. माध्यमांशी बोलतांना टोपे म्हणाले,’ विरार येथे घडलेली ही नॅशनल न्यूज नाही. आम्ही राज्य सरकारच्या वतीने पूर्णपणे मदत करणार आहोत, ही राज्यातील घटना आहे. आपण राज्यात होणाऱ्या ऑक्सिजन ,रेमडेसिवीर तुटवड्याबाबत बोलायला हवे, या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करायला हवं, मी या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींशी ऑक्सिजनसंदर्भात बोलणार आहोत.

दरम्यान, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र आज १३ निष्पाप जणांना विनाकारण आपला जीव गमवावा लागल्यावरही आरोग्य मंत्र्यांनी केलेल्या विधानावरून त्यांच्यावर सर्व बाजूंनी टीका होताना दिसत आहे. तसेच विरोधकांनी आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Team Global News Marathi: