अशाप्रकारे चित्रपटात ‘किसिंग सीन’ शूट केला जातो, सत्य जाणून घेतल्यावर आश्चर्य वाटेल

कुठल्याही चित्रपटात अभिनेता आणि अभिनेत्री यांचे प्रेम दर्शवण्यासाठी किसिंग सीन्सपेक्षा दुसरा मार्ग कुठलाच नाही. मागील काही वर्षांपासून हॉलीवूडच नाही तर बॉलीवुड आणि अन्य प्रादेशिक भाषांमध्ये बनणाऱ्या चित्रपटांमध्येही किसिंग सीन्स आवर्जून दाखवले जातात. चित्रपटाचे निर्माता आणि निर्देशक चित्रपटाची गरज म्हणून असे सीन दाखवले जातात. म्हणून आजकाल चित्रपटापेक्षा त्या चित्रपटातील हिरो हिरॉईनच्या किसिंग सीनची जास्त चर्चा असते.

अभिनेता आणि अभिनेत्री रुपेरी पडद्यावर एकमेकांना कीस घेताना आपण अनेक वेळा पाहिले असेल. पण या दृश्यांचे शूट करणे किती अवघड आहे याचा विचार कधी केला आहे का?, किंवा आपण असा विचार केला आहे की हे किसिंग सिन करणारे दृश्य खोटे आहेत की खरं. अनेक चित्रपटांमध्ये हीरो हीरोइन एकमेकांना अजिबात किस करत नाही नाहीत. पण तुम्हाला आता नक्कीच प्रश्न पडला असेल की जर हिरो-हिरॉईन एकमेकांना किस करत नाहीत तर चित्रपटात लीप-लॉक सिन कसे दाखवले जातात?

ह्याचे उत्तर मिळाले आहे 2014 मध्ये आलेल्या साऊथ इंडियन चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी बिहाइंड द कैमरा सीनवरून. 2014 मध्ये वायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, अभिनेत्री काजल अग्रवाल आणि अभिनेता सूर्या एकमेकांना किस न करता चित्रपटात त्यांना किस करताना दाखवण्यात आले होते.

व्हायरल झालेला हा सीन 2012 मध्ये आलेल्या तामिळी तेलगू चित्रपट ‘मात्तारान’ यामधील आहे. चित्रपट पाहताना थिएटरमध्ये काजल अग्रवाल आणि अभिनेता सूर्या मध्ये किसिंग सीन शूट करण्यात आला होता. खरे पाहता या दोघांनी एकमेकांना किस केला नव्हता. तर मग चित्रपटात किसिंग सीन कसा दाखवण्यात आला? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की काजल अग्रवाल ने एका कुशनला किस केला होता, तर सूर्याने एका प्लास्टिक सीटला किस केला होता.

ज्याला नंतर विजुअल इफेक्ट्सच्या मदतीने असे दाखवण्यात आले होते की दोघांनीही एकमेकांना किस केला आहे. पण खरे पाहता असे काही नव्हते. 33 वर्षीय काजल अग्रवाल साऊथ चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे आणि तिने अनेक बॉलीवूड चित्रपटातही काम केले आहे. तिने अजय देवगन सोबत सिंघम आणि अक्षय कुमारसोबत स्पेशल 26 या चित्रपटात काम केले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: