श्वसनाचे विकार, बीपी नियंत्रणात ठेवण्यासाठी व खोकला घालवायचा असेल तर हे फळ आहे गुणकारी

श्वसनाचे विकार, मुख्यत: रात्री येणारा खोकला घालवायचा असेल तर हे फळ आहे गुणकारी

किवी हे हिरवट चॉकलेटी रंगाचे केसाळ आंबट-गोड फळ आहे. न्यूझीलंडमध्ये किवी नावाचा प्रसिद्ध पक्षी असला तरी हे फळ मुळात न्यूझीलंडमधील नसून चीनमधील आहे. चीनचे हे ‘राष्ट्रीय फळ’ आहे. याच झाडाला पूर्वी चायनीज गूजबेरी असे म्हणत. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव आहे ‘अ‍ॅक्टिनिडिया डेलिसिओसा’ (Actinidia deliciosa).

समशीतोष्ण हवामानात किवीची वाढ चांगल्या तऱ्हेने होते. चीन, न्यूझीलंड या देशांप्रमाणेच आता भारतात हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, सिक्कीम, उत्तर प्रदेश, मेघालय या राज्यांत व निलगिरी पर्वत रांगांच्या प्रदेशात किवीचे उत्पन्न घेतले जाते.

किवीचा द्राक्षाच्या वेलीसारखा एक वेल असतो. एखाद्या आधारावर या वेली वाढतात. त्यांना फुलेही येतात. नैसर्गिकरीत्या परागीकरण होण्यासाठी किवीची फुले कीटकांना अजिबात आकर्षून घेणारी नसतात.
ज्या भागात किवीची लागवड असेल तेथे माश्या किंवा कीटकांसाठी पोळी तयार करून त्यात माश्या सोडल्या जातात. जवळजवळ एक हेक्टर जागेत मोठी ८ पोळी असे प्रमाण असते.

 

झाड फुलांनी बहरले की माश्या-माश्यांमध्ये फुलातील मध खाण्यासाठी स्पर्धा सुरू होते. या स्पर्धेपोटीच ‘परागीकरण’ घडविले जाते. वेलींवर एका वर्षांतच फळे धरायला सुरुवात होते. ऑक्टोबर ते डिसेंबर या पिकाचा बहर जास्त असतो. किवीची फळे साधारण कच्ची असतानाच हाताने खुडून काढली जातात. जर योग्य पद्धतीने साठवण केली तर किवी फळ बरेच दिवस राहते.

किवी हे फळ बहुगुणी आहे. त्यात क, के आणि ई या जीवनसत्त्वांचे तसेच फॉलिक आम्ल, पोटॅशिअम यांचे प्रमाण भरपूर असते.

शरीराला आवश्यक असणारी ‘ॲंटीऑक्सिडन्ट्स’देखील असतात. इटली या देशात केलेल्या प्रयोगांतून असेही निष्पन्न झाले आहे की ‘किवी’ या फळाच्या सेवनामुळे श्वसनाचे विकार, मुख्यत: रात्री येणारा खोकला, श्वासात येणारे अडथळे इत्यादी दूर होण्यास मदत होते.

किवी खाण्याचे फायदे:-

१. संत्र्यापेक्षा दुप्पट प्रमाणात व्हिटॅमिन सी असलेलं किवी फळ आरोग्यासाठी फायदेशीर.

२. शरीरातील विषाक्त पदार्थ बाहेर काढण्याचं काम करतं किवी.

३. कमी कॅलरीज आणि अनेक फायदे असल्यामुळे जे लोक फिटनेस कडे लक्ष देतात त्यांच्यासाठी हे उत्तम.

४. किवीमध्ये व्हिटॅमिन ई आणि अ‍ॅन्टिऑक्सिडंट घटक मुबलक असतात. यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

५. किवीच्या फळामुळे आतड्यांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते. त्यामधील अ‍ॅन्टिबॅक्टेरियल गुणधर्म आतड्यांमधील घातक बॅक्टेरियांचा नाश करतात.

६. आपल्या शरीरातील कमकुवत पेशींना सुदृढ बनवण्याचे काम किवी करत असते.

७. किवी खाल्ल्याने सांधिवाताची समस्या देखील दूर होण्यास मदत होते.

८. किवी आमवात, दमा या रोगांवर गुणकारी आहे. पण डॉक्टरच्या सल्ल्यानेच याचे सेवन करावे.

तसेच तोटे देखील:-

ज्या लोकांना किडनीची समस्या आहे. त्यांनी किवी फळ खाणे टाळावे. किवीमध्ये पोटॅशियम असते, ज्यामुळे किडनीच्या आजार वाढण्याची शक्यता असते. किडनीच्या रुग्णांना आहारात पोटॅशियमची कमीतकमी मात्रा वापरण्याचा सल्ला दिला जातो. या व्यतिरिक्त, किवीमध्ये व्हिटॅमिन सी आणि लिंबू आणि संत्र्यापेक्षा दुप्पट आम्ल असते. यामुळे किवी किडनीच्या रुग्णांसाठी चांगली नसते.

किवीचे सेवन करणे त्वचेसाठी चांगले असते, परंतु ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने त्वचेचे विकार होऊ शकतात. किवीच्या जास्त खाल्ल्याने त्वचेला अ‍ॅलर्जी होऊ शकते.

गर्भवती महिलांनी एका दिवसात एक किंवा दोन पेक्षा जास्त किवी खाऊ नयेत. जास्त किवीचे सेवन केल्याने अॅसिडिटी, रॅशेस आणि घसा खवखवणे होऊ शकते.
तसेच चक्कर येणे, उलट्या होणे आणि अतिसाराची समस्या उद्भवू शकते. अशा परिस्थितीत किवी किंवा किवीपासून बनवलेल्या गोष्टी पूर्णपणे खाणे टाळावे.

कशी वाटली माहिती comments द्वारे मध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला हव्या असणाऱ्या फळे, भाज्या, फळभाज्या आणि इतर माहिती साठी comments मध्ये सांगा

ग्लोबल न्युज नेटवर्क: