Thursday, May 26, 2022
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

श्वसनाचे विकार, बीपी नियंत्रणात ठेवण्यासाठी व खोकला घालवायचा असेल तर हे फळ आहे गुणकारी

by ग्लोबल न्युज नेटवर्क
February 17, 2022
in आरोग्य
0
श्वसनाचे विकार, बीपी नियंत्रणात ठेवण्यासाठी व  खोकला घालवायचा असेल तर हे फळ आहे गुणकारी
ADVERTISEMENT

श्वसनाचे विकार, मुख्यत: रात्री येणारा खोकला घालवायचा असेल तर हे फळ आहे गुणकारी

किवी हे हिरवट चॉकलेटी रंगाचे केसाळ आंबट-गोड फळ आहे. न्यूझीलंडमध्ये किवी नावाचा प्रसिद्ध पक्षी असला तरी हे फळ मुळात न्यूझीलंडमधील नसून चीनमधील आहे. चीनचे हे ‘राष्ट्रीय फळ’ आहे. याच झाडाला पूर्वी चायनीज गूजबेरी असे म्हणत. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव आहे ‘अ‍ॅक्टिनिडिया डेलिसिओसा’ (Actinidia deliciosa).

DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur
ADVERTISEMENT

समशीतोष्ण हवामानात किवीची वाढ चांगल्या तऱ्हेने होते. चीन, न्यूझीलंड या देशांप्रमाणेच आता भारतात हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, सिक्कीम, उत्तर प्रदेश, मेघालय या राज्यांत व निलगिरी पर्वत रांगांच्या प्रदेशात किवीचे उत्पन्न घेतले जाते.

ADVERTISEMENT

किवीचा द्राक्षाच्या वेलीसारखा एक वेल असतो. एखाद्या आधारावर या वेली वाढतात. त्यांना फुलेही येतात. नैसर्गिकरीत्या परागीकरण होण्यासाठी किवीची फुले कीटकांना अजिबात आकर्षून घेणारी नसतात.
ज्या भागात किवीची लागवड असेल तेथे माश्या किंवा कीटकांसाठी पोळी तयार करून त्यात माश्या सोडल्या जातात. जवळजवळ एक हेक्टर जागेत मोठी ८ पोळी असे प्रमाण असते.

 

ADVERTISEMENT

झाड फुलांनी बहरले की माश्या-माश्यांमध्ये फुलातील मध खाण्यासाठी स्पर्धा सुरू होते. या स्पर्धेपोटीच ‘परागीकरण’ घडविले जाते. वेलींवर एका वर्षांतच फळे धरायला सुरुवात होते. ऑक्टोबर ते डिसेंबर या पिकाचा बहर जास्त असतो. किवीची फळे साधारण कच्ची असतानाच हाताने खुडून काढली जातात. जर योग्य पद्धतीने साठवण केली तर किवी फळ बरेच दिवस राहते.

किवी हे फळ बहुगुणी आहे. त्यात क, के आणि ई या जीवनसत्त्वांचे तसेच फॉलिक आम्ल, पोटॅशिअम यांचे प्रमाण भरपूर असते.

शरीराला आवश्यक असणारी ‘ॲंटीऑक्सिडन्ट्स’देखील असतात. इटली या देशात केलेल्या प्रयोगांतून असेही निष्पन्न झाले आहे की ‘किवी’ या फळाच्या सेवनामुळे श्वसनाचे विकार, मुख्यत: रात्री येणारा खोकला, श्वासात येणारे अडथळे इत्यादी दूर होण्यास मदत होते.

किवी खाण्याचे फायदे:-

१. संत्र्यापेक्षा दुप्पट प्रमाणात व्हिटॅमिन सी असलेलं किवी फळ आरोग्यासाठी फायदेशीर.

२. शरीरातील विषाक्त पदार्थ बाहेर काढण्याचं काम करतं किवी.

३. कमी कॅलरीज आणि अनेक फायदे असल्यामुळे जे लोक फिटनेस कडे लक्ष देतात त्यांच्यासाठी हे उत्तम.

४. किवीमध्ये व्हिटॅमिन ई आणि अ‍ॅन्टिऑक्सिडंट घटक मुबलक असतात. यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

५. किवीच्या फळामुळे आतड्यांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते. त्यामधील अ‍ॅन्टिबॅक्टेरियल गुणधर्म आतड्यांमधील घातक बॅक्टेरियांचा नाश करतात.

६. आपल्या शरीरातील कमकुवत पेशींना सुदृढ बनवण्याचे काम किवी करत असते.

७. किवी खाल्ल्याने सांधिवाताची समस्या देखील दूर होण्यास मदत होते.

८. किवी आमवात, दमा या रोगांवर गुणकारी आहे. पण डॉक्टरच्या सल्ल्यानेच याचे सेवन करावे.

तसेच तोटे देखील:-

ज्या लोकांना किडनीची समस्या आहे. त्यांनी किवी फळ खाणे टाळावे. किवीमध्ये पोटॅशियम असते, ज्यामुळे किडनीच्या आजार वाढण्याची शक्यता असते. किडनीच्या रुग्णांना आहारात पोटॅशियमची कमीतकमी मात्रा वापरण्याचा सल्ला दिला जातो. या व्यतिरिक्त, किवीमध्ये व्हिटॅमिन सी आणि लिंबू आणि संत्र्यापेक्षा दुप्पट आम्ल असते. यामुळे किवी किडनीच्या रुग्णांसाठी चांगली नसते.

किवीचे सेवन करणे त्वचेसाठी चांगले असते, परंतु ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने त्वचेचे विकार होऊ शकतात. किवीच्या जास्त खाल्ल्याने त्वचेला अ‍ॅलर्जी होऊ शकते.

गर्भवती महिलांनी एका दिवसात एक किंवा दोन पेक्षा जास्त किवी खाऊ नयेत. जास्त किवीचे सेवन केल्याने अॅसिडिटी, रॅशेस आणि घसा खवखवणे होऊ शकते.
तसेच चक्कर येणे, उलट्या होणे आणि अतिसाराची समस्या उद्भवू शकते. अशा परिस्थितीत किवी किंवा किवीपासून बनवलेल्या गोष्टी पूर्णपणे खाणे टाळावे.

कशी वाटली माहिती comments द्वारे मध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला हव्या असणाऱ्या फळे, भाज्या, फळभाज्या आणि इतर माहिती साठी comments मध्ये सांगा

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: किवीगुणकारीफळफुफ्फुस
Tech Drift Solutions Tech Drift Solutions Tech Drift Solutions
ADVERTISEMENT
Previous Post

किरिट सोमय्या राजकारणातील ‘शक्ती कपूर’ नवी दिल्ली : भाजपचे नेते किरिट सोमय्या हे राजकारणातील ‘शक्ती कपूर’ आहेत. त्यांनी त्यांचे काम करावे, आम्ही त्यांच्यावर बोलणार नाही, अशा शब्दांत शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सोमय्या यांना राजकारणातील खलनायक ठरविले. शिवसेना सोमय्यांबाबत आक्रमक असल्याचे यातून दिसते आहे. चंद्रकांत खैरे हे नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत आले होते. त्यांनी नवीन महाराष्ट्र सदन येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सोमय्या यांच्यावर टिका केली. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात शाब्दिक द्वंद्व सुरू आहे. त्यावेळी ते म्हणाले, ‘‘सोमय्या यांनी आरोप करावेत, आम्ही त्याच्यावर बोलणार नाहीत. परंतु मी त्यांनी राजकारणातील ‘शक्ती कपूर’ म्हणतो. यापेक्षा आणखी त्यांच्याविषयी बोलण्यासारखे काही नाही.’’ ज्योतिरादित्य शिंदे यांच्या भेटीबाबत त्यांनी सांगितले, की चिकलठाणा, औरंगाबाद येथील विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव द्यावे, अशी मागणी शिवसेना सातत्याने करीत आहेत. मात्र, त्याबाबत अजून निर्णय झालेला नाही. यासंबंधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील केंद्र सरकारकडे ६ जानेवारी २०२१ रोजी विमानतळाचे नामकरण करण्याची विनंती केली होती. त्याअनुषंगाने ही भेट होती. ‘‘महाराष्ट्राच्या विधिमंडळाने औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याचा ठराव संमत केला आहे. त्याचा पाठपुरावा करण्यासाठी मी शिंदे यांची भेट घेतली आहे. यासंबंधी अधिसूचना जारी करण्याची विनंती केली आहे. लवकरच या विमानतळाला संभाजी महाराज यांचे नाव देण्याची कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे,’’ असा दावा खैरे यांनी केला.

Next Post

कुख्यात गुंड गजानन मारणेच्या पत्नीचा मनसेला रामराम; राष्ट्रवादीत प्रवेश –

Next Post

कुख्यात गुंड गजानन मारणेच्या पत्नीचा मनसेला रामराम; राष्ट्रवादीत प्रवेश -

Recent Posts

  • जे जे अनैतिक आहे, ते काम संजय राऊत करतात, चंद्रकांत पाटलांची टीका
  • छत्रपती संभाजीराजे भाजपवर ऐवढे नाराज का आहेत?;
  • “देशमुख, मलिकांनंतर आता परबांचा नंबर; अनिल परबांनी कपड्यांची बॅग तयार ठेवावी”
  • “केंद्र सरकारकडून व भाजपकडून सूडाच्या भावनेने ईडीच्या साह्याने कारवाया ; संजय राऊतांची प्रतिक्रिया
  • ‘बृजभूषण यांनी महाराष्ट्रात पाय ठेवून दाखवावं, मनसेचं थेट आवाहन

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group