हे उपोषण माझ्या प्रकृतीसाठी आणि समाजासाठी थांबणं गरजेचं’

हे उपोषण माझ्या प्रकृतीसाठी आणि समाजासाठी थांबणं गरजेचं’

मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी छत्रपती संभाजीराजे यांनी आक्रमक पवित्रा घेत आमरण उपोषण पुकारलं आहे. 26 तारखेपासून आझाद मैदानात त्यांनी उपोषणाला सुरुवात केली. मात्र, त्यांची प्रकृती बिघडल्याचं समोर आलंय. याआधी महाविकास आघाडी सरकारच्या वतीने गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलयांनी छत्रपतींची भेट घेतली. यानंतर राजकीय घडामोडींना वेग आलाय.

संभाजी छत्रपतींना वर्षा बंगल्यावरून चर्चेसाठी निमंत्रण आलं आहे. यासाठी ते स्वत: न जाता मराठा समाजाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी जाणार आहेत. त्यांना संयमाने भूमिका मांडण्यासाठी संभाजीराजेंनी आवाहन केलं आहे. आता खूप त्रास होऊ लागलाय, पण तरीही समाजाठी मी झटणार असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.

हेही वाचा: ‘उपोषणास येणाऱ्या मराठा बांधवांना प्रशासनाने अटकाव करु नये’

मराठा समन्वयकांनी कायदा हातात घेऊ नये, या मताचा मी आहे. मुख्यमंत्र्यांकडून बोलवणं आल्यामुळे आता समन्वयकांनी जाऊन आपलं म्हणणं मांडा, असं छत्रपती म्हणाले. मी संभाजी आहे राजे नाही, मी जनतेचा सेवक आहे. मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री यांनी बोलावलं असेल तर आपण प्रोटोकॉल नुसार जावं लागतं, असं त्यांनी म्हटलं.

हेही वाचा: संभाजीराजेंच्या उपोषणाला रशियातून विद्यार्थ्यांचा पाठिंबा

काय म्हणाले छत्रपती?

हे आंदोलन माझ्या प्रकृीसाठी थांबण गरजेचं

मी समाजाला वेठीस धरलं नाही

कोणालाही सांगता येत नाही…आरक्षण कधी मिळेल

२२ मागण्या आहेत…त्यातील प्रमुख ५-७ मागण्या माझ्या आहेत

या मागण्या राज्य सरकार मान्य करू शकतं

आज खूप त्रास होतोय…सरकार आणि समाजानेच ठरवावं मला कुठे न्यायचंय

आज सकाळी कॉल आला आहे.. यावर मार्ग काढण्यासाठी

समाजाचा प्रश्न निकाली लागण महत्वाचं

गरीब मराठ्यांचा प्रश्न मार्गी लागणं महत्वाचं आहे

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: