“निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस व राष्ट्रवादीची निवडणूक तयारी सुरु तर सेना-भाजपा शांत

 

नगर |आगामी नऊ नगरपालिका तसेच जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांची तयारी महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन पक्षांनी नगर जिल्ह्यात सुरू केली आहे.आघाडी सरकारमधील त्यांचा तिसरा सहकारी पक्ष असलेला शिवसेना आणि या तीन पक्षांच्या आघाडीविरोेधात असलेल्या भाजपच्या गोटात मात्र अजूनही थंड वातावरण आहे. दरम्यान, काँग्रेसने आज शिर्डीत व राष्ट्रवादीने मंगळवारी नगरमध्ये आगामी निवडणुकांच्यादृष्टीने आढावा बैठकांचे नियोजन केले आहे.

जिल्हा परिषदेच्या ८५ व पंचायत समित्यांच्या १७० जागांसह नऊ नगरपालिकांच्या मिळून सुमारे दोनशेवर जागांसाठी येत्या दोन-तीन महिन्यात निवडणुकांचा धुराळा उडणार आहे. या पार्श्‍वभूमीवर दोन्ही काँग्रेसने आवश्यक तयारी सुरू केली आहे. इच्छुकांची माहिती घेण्यासह संघटनात्मक रचना व अन्य राजकीय पक्षांच्या हालचाली यांची माहिती घेतली जात आहे तसेच नाशिक पदवीधर मतदार संघाच्या आगामी निवडणुकीचीही तयारी आतापासूनच सुरू करण्यात आली आहे.

या पार्श्‍वभूमीवर शिर्डीत सोमवारी उत्तर महाराष्ट्राच्या काँग्रेस पदाधिकार्‍यांचा मेळावा सकाळी 11वाजता साई सृष्टी मंगल कार्यालय येथे होणार असून, यावेळी पक्षाचे प्रभारी एच.के. पाटील, पल्लम राजू, ना. बाळासाहेब थोरात, के.सी.पाडवी उपस्थित राहणार आहेत. नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी या मेळाव्याचे नियोजन केले आहे.

Team Global News Marathi: