“ही शाखा आहे, दुकान नव्हे इथं आल्यावर प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळायल्यालाच हवा”

 

मुंबई | राज्यात होणाऱ्या आगामी महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरवात केली असून सर्वच पक्ष मोर्चेबांधणीच्या तयारीला लागले आहेत. अशातच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मोर्चाबांधणीला सुरवात केली आहे. राज ठाकरे यांच्या हस्ते अनेक ठिकाणी मनसेच्या शाखा स्थापन करण्यात आल्या आहे. या शाखा काही दुकानं नाही, त्यामुळे इथं आलेल्या प्रत्येकांना न्याय मिळाला पाहिजे, असं म्हणत राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना बजावले आहे.

‘मुंबई महानगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभुमिवर मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गेले काही दिवस शाखांचे उद्घाटन करत आहेत. आज प्रभादेवी येथील शाखा क्रमांक २०१ चे उद्धाटन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. राज यांनी पुन्हा एकदा मराठी पाट्यांचा मुद्दा उपस्थितीत केला तसंच कार्यकर्त्यांनाही चांगलाच समज दिला. आज काही भाषण करणार नाही. व्यासपीठावर तुमचं दर्शन घ्यायला आलो. कारण खालून दर्शन होत नाही असे त्यांनी यावेळी बोलून दाखविले होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, निवडणूक लागतील कधीही कदाचित याच महिन्यात घोषणा होईल, पण अजून तरी या वातावरणात निवडणूक वाटत नही. आता निवडणुका लागल्यावर सगळ्यांची पाक पाक सुरू होईल, तेव्हा आमचीही सुरू होईल, असं म्हणत राज ठाकरेंनी जोरदार इशारा दिला. ‘मी सभा घेणार आहे, इथेही तेव्हा घेईन. ही शाखा आहे, दुकान नव्हे इथं आल्यावर प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळायल्यालाच हवा, असंही राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना कडक शब्दांत बजावलं.

Team Global News Marathi: