‘हा’ कलाकार घेणार किरण माने यांची जागा? घेणार विलास पाटलाची भूमिका

 

सातारा | स्टार प्रवाहावरील मालिका ‘मुलगी झाली हो’ मालिका सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. किरण माने प्रकरणाला एक वेगळच वळण मिळालं आहे. किरण माने यांना मालिकेतून काढून टाकण्यात आलं आहे. आता किरण माने यांची भूमिका कोण साकारणार? याबाबत नाव समोर आलं आहे.

‘मुलगी झाली हो’ मालिकेत साजिरीच्या वडिलांची भूमिका कोण साकारणार? हा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. वेगवेगळ्या नावांचा विचार प्रेक्षक करत होते. पण आता अभिनेता आनंद अलकुंटे विलास पाटलाची अर्थात साजिरीच्या वडिलांची भूमिका साकारणार आहे.

सध्या तरी याविषयी प्रोडक्शन हाऊसकडून कोणतीच अधिकृत माहिती मिळाली नाही. आनंद अलकुंटे याआधी ‘रुद्रम’ मालिकेत पोलिसांच्या भूमिकेत दिसला होता. तसेच ‘बंदिशाळा’, ‘जोगवा’ चित्रपटात भूमिका साकारली आहे. तसंच बऱ्याच हिंदी चित्रपटांमध्येदेखील काम केलं आहे.

Team Global News Marathi: