ते असताना संपवू शकले नाहीत, नसताना काय संपवणार? राणेंच्या त्या पोस्टरची होत आहे चर्चा

 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ७५ व्या स्वत्रंत्र दिनाच्या मुद्द्यावरून थेट कानशीली लावण्याचे विधान केले होते. यावरून राज्यातील राजकारण चांगलच तापू लागलं होत. तसेच अनेक ठिकाणी सेना-भाजपा कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची झाल्याचे वृत्त सुद्धा समोर आले होते. त्यातच आता सिंधुदुर्गात राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेच्या
स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

देवगड मांजरेकर नाक्क्यावर हे लक्ष वेधून घेणारे बॅनर लावले आहेत. या बॅनरवर “ते असताना नाही संपवू शकले, तर ते नसताना काय संपवणार? #दादागिरी”. अशा आशयाचा फलक लावण्यात आला आहे. नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा देवगडमध्ये आज येणार आहे. त्याआधीच हा फलक लावण्यात आला आहे. देवगडमध्ये सध्या हा फलक सर्वांच्या चर्चेचा विषय बनला आहे.

देवगड शिवसेना शाखेबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. याठिकाणी काही शिवसैनिक हातात भगवे झेंडे घेऊन उभे आहेत. साधारण ३० ते ४० शिवसैनिक उपस्थित आहे. जामसंडेची सभा झाल्यानंतर याच मार्गावरून नारायण राणे यांची जनाशीर्वाद यात्रा जाणार आहे. त्यामुळे वाद होऊन नाय म्हणून पोलिसानी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

Team Global News Marathi: