बांधकाम कामगारांसह कुंटुंबियांनाही स्थैर्य देण्यासाठी कटिबद्ध – हसन मुश्रीफ

स्वतः ऊन, वारा, पाऊस झेलत दुसर्याना निवारा निर्माण करण्याचे उदात्त काम करणाऱ्या बांधकाम कामगारांसह त्यांच्या कुंटुंबियांना स्थैर्य लाभेल यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. एकही कामगार योजनेपासून वंचित राहू नये, याची कार्यकत्यांनी काळजी घ्यावी असे विहान राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले होते. ते आज कोल्हापूर कागल येथे कार्यक्रमानिमित्त आलेले स्तन त्यांनी हे विधान केले आहे.

यावेळी आशा व गटप्रवर्तक यांच्या मानधनात वाढ केल्याबद्दल व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांकडून सत्कार, एनएमएनएस परिक्षेत यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार, शुभम मंगल कार्यालयाचे उद्घाटन, कामगार मयत सानुग्रह अनुदानाचे वाटप, बांधकाम कामगारांना माध्यान्ह योजनेचा शुभारंभ, त्यांना ओळखपत्रांचे व सुरक्षा किटचे वाटप मान्यवरांच्या हस्ते झाले.

यावेळी जिल्हा कामगार आयुक्त संदेश आयरे यांनी कामगारांना योजनेसह नोंदणीबाबत माहिती दिली. बिद्री साखर कारखान्याचे संचालक प्रविणसिंह भोसले, बाजार समितीचे माजी सभापती दिनकर कोतेकर, माजी उपसरपंच रमेश पाटील, शिक्षकनेते जी. एस. पाटील, डॉ. विजय चौगुले, जीवन कांबळे, दिलीप कांबळे, संतोष गायकवाड, अमोल कुंभार, हिंदुराव पाटील, एच. एन. पाटील, निवास पाटील, प्रकाश माळी, माजी सरपंच भारत लोहार, शिवाजी सुतार आदी उपस्थित होते.

 

Team Global News Marathi: