वे डरते हैं कि, एक दिन निहत्थे और ग़रीब लोग उनसे डरना बंद कर देंगे – जयंत पाटील

 

फोन टॅपिंग प्रकरणापासून ते कृषी कायद्यापर्यंतच्या मुद्द्यावर मोदी सरकार संसदेत चर्चा घडवून आणत नाही. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. पाटील यांनी थेट कवितेतूनच केंद्रावर निशाणा साधला आहे. वे डरते हैं कि, एक दिन निहत्थे और ग़रीब लोग उनसे डरना बंद कर देंगे, असं म्हणत जयंत पाटील यांनी केंद्रावर हल्लाबोल केला आहे.

जयंत पाटील यांनी प्रसिद्ध कवी गोरख पाण्डेय यांची उनका डर ही कविता ट्विट करून हा जोरदार केंद्र सरकारवर टीका केली आहे. किस चीज़ से डरते हैं वे, तमाम धन-दौलत, गोला-बारूद पुलिस-फ़ौज के बावजूद?, वे डरते हैं कि एक दिन निहत्थे और ग़रीब लोग, उनसे डरना बंद कर देंगे! कवितेच्या या वेळी ट्विट करून पाटील यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल करतानाच केंद्राला सवालही केले आहेत.

स्वातंत्र्य दिन अवघ्या दोन दिवसावर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी या कवितेच्या माध्यमातून देशाची परिस्थिती, जनतेची मानसिकता आणि सरकारच्या हुकूमशाहीवरच ताशेरे ओढले आहेत. पाटील यांनी अचूक टायमिंग साधत ही कविता शेअर केल्याने जोरदार चर्चा रंगली आहे. आता जयंत पाटील यांच्या टीकेला भाजपा नेते काय उत्तर देतात हे पाहावे लागणार आहे.

 

Team Global News Marathi: