‘मार्मिक’चा आज वर्धापनदिन, शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मार्गदर्शन |

‘मार्मिक’चा आज वर्धापनदिन, शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मार्गदर्शन |

मुंबई | हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘मार्मिक’मधून मराठी माणसावरील अन्यायाला वाचा फोडली. कुंचल्याच्या फटकाऱयांतून तत्कालीन सरकारी व्यवस्थेला जेरीस आणले. ‘मार्मिक’चा ६१वा वर्धापनदिन नामवंत कलाकारांच्या उपस्थितीत आज शुक्रवारी १३ ऑगस्ट रोजी ऑनलाइन पद्धतीने साजरा होत आहे.

शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘मार्मिक’चे वाचक, शिवसैनिक तसेच तमाम मराठी बांधवांना मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी ५ वाजता हा सोहळा ‘यू टय़ुबवर’ लाइव्ह अनुभवता येणार आहे. व्यंगचित्रांच्या माध्यमातून इतिहास घडवणाऱया ‘मार्मिक’ साप्ताहिकाचा वर्धापनदिन कोरोनामुळे सलग दुसऱया वर्षी ऑनलाइन पद्धतीने साजरा होत आहे.

सदर कार्यक्रमाला प्रसाद खांडेकर, नम्रता आवटे, कौशल इनामदार, मिलिंद शिंत्रे, कार्तिकी गायकवाड हे कलाकार कला सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृण्मयी गोडबोले करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्धापनदिनानिमित्त काय मार्गदर्शन करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सायं. 5.00 वाजता यू टय़ूबवर लाइव्ह – https://youtube.com/c/ShivSenaOfficial

 

 

Team Global News Marathi: