थेट भाजपाला धक्का १०० हुन महिला कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश

 

एकनाथ शिंदे यांनी बंड पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात पुकारत भाजपसोबत राज्यात नवं सरकार स्थापन केलं. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांना एकापाठोपाठ एक असे अनेक धक्के बसले. पण आता एकनाथ शिंदे यांनी भाजपलाच धक्का दिला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

मुंबईतील 100 हून अधिक महिला पदाधिकाऱ्यांनी भाजपला रामराम ठोकत शिंदे गटात प्रवेश केला आहे. दहिसरचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या उपस्थितीत काल भाजपच्या 100 हून अधिक महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. प्रकाश सुर्वे यांनी स्वतः या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाचे फोटो ट्विट केले आहेत. सुर्वे यांच्या मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक 25 मधील भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

शिवसेना-राष्ट्रवादीनंतर शिंदे गटाने सत्तेत सहभागी असलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपल्या पक्षात घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे 40 आमदार, 12 खासदारांना गळाला लावले. त्यानंतर हळूहळू राज्यभरातून वेगवेगळ्या शहरांमधल्या नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनीही शिंदे गटात प्रवेश केला. आता या पक्षप्रवेशावर भाजपा काय प्रतिक्रिया देते हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: