” …अदानींसोबत हवेत उडणारे हे सज्जन शेतकऱ्यांचे हितचिंतक आहेत”

 

नवी दिल्ली | शेतकरी आंदोलनाला शनिवारी सात महिने पूर्ण झाले. मागील सात महिन्यांपासून केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये आंदोलन केलं जात आहे. शेतकऱ्यांच्या वाढत्या विरोधामुळे आणि त्यांनी दिल्लीमध्ये प्रवेश करु नये म्हणून पोलिसांनी दिलेल्या सिमांवर तटबंदी उभारल्याचंही दिसून आलं.

 

 

याचदरम्यान शेतकरी नेते राकेश टिकैत यांना अटक झाल्याच्या अफवाही पसरली होती. मात्र नंतर टिकैत यांना अटक करण्यात आली नसल्याचं स्पष्ट झालं. शेतकरी आंदोलनातील काही नेत्यांच्या दाव्यानुसार टिकैत हे शेतकऱ्यांच्या हिताच्या बाजूने नसल्याचा आरोप केला जातो. या वरुनच समाजवादी पक्षाचे नेते आय. पी. सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी विमानात बसल्याचं दिसत आहे. मोदींसोबतच उद्योगपती गौतम अदानीसुद्धा या विमानातून प्रवास करत असल्याचं दिसत आहे. हा फोटो शेअर करताना सिंह यांनी. “टिकैत शेतकऱ्यांचं हित जपणारे नेते नाहीत, अदानींच्या विमानामधून उड्डाण करणारे हे सज्जन शेतकऱ्यांचे हितचिंतक आहेत,” असा टोला लगावला आहे.

Team Global News Marathi: