‘पंतप्रधान मोदी २०२४ मध्ये क्लीन बोल्ड होतील..’ केआरकेने वर्तवले भाकीत |

 

सतत वादग्रस्त ट्विट करून टीका करणाऱ्या अभिनेता आणि स्वघोषित समीक्षक कमाल रशिद खान म्हणजेच ‘केआरके’ अनके अभिनेता आणि अभिनेत्रींनवर टीका करत असतो काही दिवसांपूर्वी त्याने सलमान खान आणि कंगना राणावत ह्यांच्या चित्रपटावर ट्विट करून नवा वाद अंगावर ओढावून घेतला होता.

मात्र हाच केआरके सोशल नेटवर्किंगवरील त्याच्या पोस्ट आणि वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. यासाठी नेटकरी त्याला ट्रोलही करतात परंतु केआरकेला त्याचाही काहीही फरक पडत नाही. सतत प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठीच तो असे कारनामे करत असतो असा आरोप नेटकरी त्याच्यावर करतात.

मात्र केआरकेने आता थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल एक भविष्यवाणी केली आहे आणि त्यामुळेच केआरके पुन्हा चर्चेत आला आहे. त्याने नरेंद्र मोदी आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात ट्विट केलं आहे.
‘माझ्या आजच्या अंदाजानुसार, पंतप्रधान मोदीजी २०२४ मध्ये क्लीन बोल्ड बाद होणार..’ असं केआरकेने ट्विटमध्ये म्हटलं आहे. सध्या त्याचे हे ट्विट सोशलवर चांगलेच व्हायरल झाले.

 

Team Global News Marathi: