कोणत्याही स्त्रीला खुश ठेवायचे असेल तर या गोष्टी केल्या पाहिजे !

 

कोणत्याही स्त्रीला खुश ठेवायचे असेल तर या गोष्टी केल्या पाहिजे !

मित्रांनो सध्याचे सर्वात आव्हानात्मक काम म्हणजे पत्नीला खुश ठेवणे. ती कोणत्या कारणावरून नाराज होईल हे सांगता येत नाही. बरीच लोक आपल्या पत्नीला खुश ठेवण्यासाठी महागडी गिफ्ट्स देतात, मौल्यवान वस्तू देतात. परंतु एवढं सगळं करून सुद्धा त्यांची पत्नी खुश नसते. असे का होते? मित्रांनो भौ’तिक सुखच म्हणजे सगळं काही नसतं. आजच्या लेखामध्ये मी तुम्हाला अश्या काही गोष्टी सांगणार आहे, ज्याचा अवलंब तुम्ही तुमच्या आयुष्यात केला तर नक्कीच तुमची पत्नी खुश राहील.

तिने तुमचा वेळ न मागता, तुम्ही तुमचे 30 मिनिटे वेळ तिला द्या. तिला वेळ असा द्या की त्या वेळेमध्ये तुमचे सर्व लक्ष तिच्याकडेच असेल. त्या वेळेमध्ये तुम्ही ना मोबाइल बघणार, ना टिव्ही बघणार. तुमचे लक्ष फक्त आणि फक्त तुमच्या पत्नीवर पाहिजे. असे केल्याने तिला तुमच्याबद्दल आणखीन प्रेम, आपुलकी, जि’व्हाळा वाटायला लागेल. आणि ती कायम खुश राहील.

भेट म्हणून किंवा काही खास प्रसंगी तिला फुले किंवा फुलांचा गजरा द्या. जेंव्हा तुम्ही सायंकाळी घरी येता त्यावेळी तिच्यासाठी फुलांचा गजरा घेऊन जा आणि तो गरजा तुम्ही स्वतःच्या हाताने तिच्या केसांमध्ये माळा. अश्याने तिला तुमच्या प्रेमची जाणीव होईल आणि ती फार आनंदी होईल. मित्रांनो पत्नीला खुश ठेवण्यासाठी फार मोठ्या कोणत्या गिफ्ट किंवा सरप्राईजची गरज नसते तुम्ही असे फुले किंवा फुलांचा गजरा देऊन सुद्धा तिला खुश ठेवू शकता.

सायंकाळी घरी आल्यानंतर दुसरी कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी ती कुठे आहे ते पहा आणि तिला आलिंगन द्या. जेंव्हा तुम्ही ऑफिसमधून आल्यानंतर असे करता तेंव्हा ती लाजते आणि तिला तुमच्याबद्दल आणखीन प्रेम वाटायला लागते. अश्याने तुमचे नाते आणखीन घ’ट्ट होते आणि तुमची पत्नी खुश राहायला लागते. या आलिंगनासोबतच तुम्ही तिला चहा बनवायला सांगितले तर ती लगेच बनवून देईल, तुमचे सर्व कामे ती ऐकायला लागेल.

तुम्ही तिला रात्री झोपण्यापूर्वी तिचा आजचा दिवस कसा गेला, याबद्दलचे काही खास प्रश्न विचारा. ज्यामुळे तुम्हाला समजेल तिने ठरवलेली आजची कामे पूर्ण झाली की नाही? जसे की, तू आज शॉपिंगला जाणार होती ना त्याचे काय झाले? अश्या प्रकारच्या प्रश्नांमुळे तुम्हाला तिच्या आजच्या दिवसाचा अंदाजा येईल. आणि तिलाही वाटेल की, माझ्या पतीचे माझ्या सर्व गोष्टींकडे लक्ष आहे.

आणि ती खुश राहायला लागेल.

महिन्यातून एखाद्या शुक्रवारीच्या रात्री तिला विचारा, आपण शनिवार आणि रविवारचा काय प्लॅन करायचा? विचारण्याऐवजी तिला थेट फिरायला घेऊन जा. महिलांना फिरायला फार आवडत असते. शक्य असेल तर प्रत्येक शनिवार किंवा रविवार तिला बाहेर हॉटेलमध्ये जेवणासाठी घेऊन जा. तेवढाच एक दिवस तिला चेंज वाटेल आणि त्या दिवसाचा तिचा स्वयंपाक बवण्याचा व्यापही कमी होईल. अश्या गोष्टींमधून तुम्ही तिला आनंद देत जा ती नेहमी खुश राहील.

ती सुंदर दिसते हे तिला आवर्जून संगा. स्त्रियांना त्यांची स्तुती केलेली फार आवडत असते त्यातल्या त्यात जर तुम्ही त्यांच्या सौंदर्याची प्रशंसा करत असाल तर त्या खूप खुश होतील. सौंदर्यच्या बाबतीत स्त्रिया फार भावनिक असतात, कधी त्यांच्या साडीची, कधी केसांची, तर कधी त्यांच्या चेहऱ्याची स्तुती करा. त्या फार लाजतील आणि खुश देखील होतील. तिने बनवलेल्या जेवणाचीही स्तुती करून बघा आणखीनच जास्त खुश होईल ती.

ती जेंव्हा थकलेली, दमलेली असते त्या त्यावेळी तिच्या भावनांचा आदर करा. ती जेंव्हा थकलेली असते त्यावेळी तिची मदत करा. तिला स्वयंपाक करण्यात मदत करा. घरातील इतर कामे करण्यात मदत करा, जेणेकरून तिला तुमच्याबद्दल आपुलकी आणखीच वाटेल आणि ती खुश राहील. महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला रात्री घरी येण्यासाठी उशीर होत असेल तर तसे तिला आधीच कॉल करू सांगा आणि तिने उशीरा तुमच्यासोबतच जेवले पाहिजे असे बंधन तिला घालू नका. अश्याने ती खुश राहील.

जर कधी तुमच्याकडून तिच्या भावना दुखावल्या गेल्या तर तेंव्हा त्याबाबत स’हानुभूती दर्शवा आणि म्हणा, मी तुला दुखावले असेल तर मला माफ कर. आणि मग थोडा वेळ शांत बसा. तिच्या भावना तुम्ही जाणून घेतल्या आहेत, हे तिला समजू द्या. जेंव्हा तिच्या लक्षात येईल की, तुम्हाला तिच्या भावना समजल्या आहेत, तेंव्हा ती आपोआप तुमच्या जवळ येईल. दिवसातून किमान चार वेळा तरी तिला जवळ घ्या, ऑफिसमध्ये असाल तर किमान 2 वेळा तरी तिला कॉल करा. अश्या गोष्टींमुळे ती आणखीन खुश होईल. मित्रांनो वरील सर्व गोष्टी करत राहा, तुमची पत्नी कधीच तुमच्यावर नाराज होणार नाही, ती कायम खुश राहील. लेख आवडला असेल तर आवर्जून शेअर करा.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: