मनसे सोबत युती होणार नाही, हा विषय आमच्यासाठी आणि राज ठाकरेंसाठी संपला आहे

 

मागच्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना-भारतीय जनता पार्टीमध्ये युतीची चर्चा सुरु होती. पण या चर्चेला कायमचा पूर्णविराम लागला आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेशी युती न करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावर शिक्कामोर्तब केलं आहे.

मनसे सोबत युती होणार नाही, हा विषय आमच्यासाठी आणि राज ठाकरेंसाठी संपला आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीत चर्चा नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. यापूर्वीच भाजपा बरोबर युती कार्याची की नाही हे मी ठरवेन असे ठणकावून राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले होते.

.
शिवसेनेला सत्तेतून खेचण्यासाठी भाजपने मनसेसोबत चचपणी करण्यास सुरुवात केली होती. या संभाव्य युतीच्या गेले काही महिने होत असलेल्या चर्चाना पूर्णविराम मिळाला आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतेय. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपने मनसेशिवाय लढण्याचा निर्णय घेतला आहे.

Team Global News Marathi: