एसटीच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावरुन परिवहनमंत्री अनिल परब यांचे सूचक विधान

 

मुंबई | एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी मागच्या काही दिवसांपासून कर्मचारही आंदोलन करत असून अद्याप या आंदोलनातून तोडगा निघालेला नाहीये अशातच आता एसटी महामंडळाने राज्यपाल कोश्यारी यांना निवेदन दिले होते याच पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाष्य केले होते.

एसटीच्या विलनीकरणाचा मुद्दा हायकोर्टाच्या समितीसमोर असल्याने राज्यपाल त्यामध्ये हस्तक्षेप करु शकत नाहीत तसेच समितीचा अहवाल आल्यानंतर विलनीकरणाचा निर्णय ठरेल, अशी प्रतिक्रिया परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. रत्नागिरीत ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम रत्नागिरी येथे परिवहन आणि पालकमंत्री अनिल परब यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला.

यावेळी माध्यमांसोबत संवाद साधला. “एसटीच्या विलनीकरणाचा मुद्दा हायकोर्टाच्या समितीसमोर आहे. त्यामध्ये दुसरे कोणीही हस्तक्षेप करु शकत नाही. कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार काम सुरु आहे त्यामुळे राज्यपाल त्यामध्ये हस्तक्षेप करु शकत नाहीत असे विधान यावेळी परब यांनी केले होते.

.

Team Global News Marathi: