करोना काळात “राजकारण” नको म्हणणाऱ्यांनी आभार मानायला हरकत नव्हती – संदीप देशपांडे

मुंबई : हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सीन बनविण्यास केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली आहे. मात्र याच मुद्द्यावरून आता श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. यावरून सेना-मनसेमध्ये खटके उडायला सुरवात झालेली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून हाफकिनला लस उत्पादनाची परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. त्यानंतर काही दिवसांत हा निर्णय झाल्याने मनसेने याचे श्रेय घेतले. या संदर्भात मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे याने ट्विट करून शिवसेनेला टोला लगावला आहे.

देशपांडे यांनी ट्विट करत म्हटलं की, राज्य सरकारने जानेवारीतच हाफकिंगला लस बनवण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव पाठवला होता. पण त्याची परवानगी राजसाहेबांचं पत्र गेल्यावर आली याला म्हणतात “ठाकरे ब्रँड”.कोरोना काळात “राजकारण” नको म्हणण्याऱ्यानी आभार मानायला हरकत नव्हती असं सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना चिमटा काढला आहे.

तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही ट्विट करून १००% लसीकरणाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हाफकिन्ससारख्या संस्थेला लस उत्पादन करण्याची मुभा द्यावी ह्या माझ्या विनंतीला आपण मान्यता दिलीत ह्याबद्दल पंतप्रधानांचे मनापासून आभार मानले आहेत. केंद्र सरकारकडून असंच सहकार्य मिळत राहिल्यास एकत्रितपणे आपण ह्या संकटावर सहज मात करू हे नक्की असं राज यांनी सांगितले.

Team Global News Marathi: