संज्या सारखे मर्दानगीची वार्ता करतात यासारखं हास्यास्पद काही नाही’ – निलेश राणे

संज्या सारखे मर्दानगीची वार्ता करतात यासारखं हास्यास्पद काही नाही’ – निलेश राणे

‘हिंमत असेल तर समोर येऊन लढावं. बायका-पोरांच्याअडून आवाज दाबण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. आम्ही समोरासमोर लढणारे आहोत. हे सरकार पाडण्यासाठी हे सर्व सुरु असून माझं नाव संजय राऊत आहे, काय उखडायचं आहे ते उखडावं. हे प्रकरण आता भाजपला महागात पडेल, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला दिला होता.

आता राऊतांनी भाजपाला दिलेल्या इशाऱ्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी राऊतांना टोला लगावला आहे. संज्या सारखे भिकार मर्दानगीची वार्ता करतात यासारखं हास्यास्पद काही नाही.

ज्यांनी आयुष्य एका खोलीत बसून काढलं तो मैदानात लढण्याची वार्ता करतो, मैदानात आल्यावर कळेल संज्याला ‘नागडं’ कशाला म्हणतात. मग म्हणतच बसावं लागेल ‘ मै नंगा हू’. एका नोटीसला इतका घाबरला संज्या. असे ट्विट त्यांनी केले आहे. आता राणे यांच्या या ट्विटला सेने काय उत्तर देते हे पाहावे लागणार आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: